Advertisements
Advertisements
Question
राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता?
Solution
भारतातील आद्य समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी पुढील सुधारणांचा आग्रह धरला -
(१) त्यांनी सती पद्धतीला विरोध केला. प्राचीन संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी हे सिद्ध केले की, धर्मग्रंथांमध्ये सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा कोठेही उल्लेख नाही.
(२) समाजातील बालविवाह पद्धतीला त्यांनी विरोध केला.
(३) स्त्रियांबाबत असलेल्या पडदा पद्धतीला त्यांचा विरोध होता. पडदा पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात, असे त्यांचे मत होते.
(४) ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मूर्तिपूजेची गरज नाही, असे रॉय यांचे मत होते; म्हणून त्यांनी मूर्तिपूजेस विरोध केला.
(५) ईश्वर एकच आहे, हा विचार त्यांनी मांडला. अनेकेश्वर वाघाला त्यांचा विरोध होता.
(६) सर्व धर्मांतील समान तत्त्वे शोधणाऱ्या आणि समाजातील अंधश्रद्धांवर आघात करणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी समाजसुधारणेचा सतत आग्रह धरला. आपल्या लेखनातून त्यांनी आधुनिक विचारांची पायाभरणी केली.