Advertisements
Advertisements
Question
रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण द्या.
Solution
उत्प्रेरक - पोटॅशिअम क्लोरेट (KClO3) तापवले असता त्याचे अपघटन मंदगतीने होते.
\[\ce{2KClO3 ->[\Delta] 2KCl + 3O2}\]
कणांचा आकार लहान करून वा अभिक्रियेचे तापमान वाढवून देखील वरील अभिक्रियेचा दर वाढत नाही. परंतु मँगेनीज डायऑक्साइड (MnO2) च्या उपस्थितीत KClO3 चे जलद गतीने अपघटन होऊन O2 वायू मुक्त होतो. या अभिक्रियेत, MnO2 मध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही.
‘‘ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो, परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात.’’
हायड्रोजन पेरॉक्साइडचे विघटन होऊन पाणी व ऑक्सिजन तयार होण्याची ही अभिक्रिया (समीकरण 17) कक्ष तापमानाला खूपच मंद गतीने होत असते पण तीच अभिक्रिया मँगेनिज डायऑक्साइड (MnO2) ची पावडर टाकल्यावर जलद वेगाने घडते.