Advertisements
Advertisements
Question
राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी करण्यात आलेल्या संरचनात्मक तरतुदी स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
- सार्वत्रिक प्रौढ मातधिकारासहित लोकशाही व्यवस्था निर्माण करून राष्ट्र बळकट करणे हे संरचनात्मक दृष्टीने महत्त्वाचे होते. लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना पूरक होते. विविध गटांचा शासनामधील सहभाग प्रातिनिधिक लोकशाहीमुळे शक्य झाला.
- संविधानाने प्रबल केंद्रशासनासहित संघराज्य व्यवस्था स्वीकारली. त्यामुळे प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यांमध्ये समतोल साधता आला. १९९० च्या दशकात केलेल्या घटनादुरुस्तीमुळे (७३ व ७४ वी घटनादुरुस्ती) पंचायत व्यवस्थेतून स्थानिक शासन संस्थांचा सहभाग अधिक वाढला.
- सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संविधानाने प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांची मान्यता दिली आणि भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आली.
- प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा (IAS, IPS, IFS, IRS इत्यादी) अस्तित्वात आल्या. यातून एक केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली. त्याचप्रमाणे राज्यस्तरावर राज्य प्रशासकीय सेवा अस्तित्वात आल्या.
- १९६१ साली राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. यामध्ये जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यांसारख्या संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी तयार करण्यावर विचार झाला. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेशी निगडित विषयांचा आढावा घेऊन त्यासंबंधी शिफारस करण्यासाठी ‘राष्ट्रीय एकात्मता परिषद’ स्थापन करण्याचे ठरले.
- भारतीय संविधानामध्ये भारतीयांसाठी काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.
shaalaa.com
भारत: संरचनात्मक परिमाण, मानसिक परिमाण आणि आव्हाने
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्ययाच्याशी निगडित आहे.
चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.
समाजातभीती/ घबराट/ धास्तीनिर्माणकरण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर -
खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे.
खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.