Advertisements
Advertisements
Question
रचनात्मक संघटन व सममिती यांमध्ये नेमका काय फरक आहे? उदाहरणांसहीत स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
- रचनात्मक संघटन म्हणजे पेशी, ऊती, अवयव आणि संस्था अशा प्रकारची निरनिराळी शरीरचना. वर्गीकरण करताना लक्षात घेण्यासाठी हा एक आधारभूत मुद्दा ठरतो. सर्व प्राणी पेशींपासून तयार झालेले असतात. अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यात सर्व कार्ये एकाच पेशीद्वारे करण्यात येतात. अशा प्राण्यांचे संघटन 'जीवद्रव्य-स्तर' या प्रकारचे असते.
- बहुपेशीय प्राण्यांच्या शरीरात अनेक पेशी असतात. (उदा., रंध्रीय प्राणी) काहींच्या शरीरात समान कार्य करणाऱ्या पेशींचे समूह, म्हणजेच ऊती असतात. (उदा., निडारिया)
तर काहींच्या शरीरात अजून प्रगती होऊन अवयव आणि नंतर संस्था तयार होतात. (उदा., चपटे कृमी व त्यापेक्षा उत्क्रांत प्राणीसंघ). उत्क्रांतीच्या प्रक्रियेत असे हळूहळू बदल होत प्राण्यांच्या संघांत जटिल रचनात्मक संघटन येत गेले. - सममिती हे शरीररचनेचा पायाच दर्शवते. वर्गीकरण करताना आधारभूत ठरणारा हाही एक मुद्दा आहे. सममिती लक्षात घेण्यासाठी प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला जातो. यावर आधारित प्राणी शरीररचनेचे निरनिराळे गट पडतात: जसे असममित शरीर (उदा., रंध्रीय), अरिय सममित (उदा., निडारिया आणि कंटकचर्मी) आणि द्विपाश्श्व सममिती (उदा., इतर सर्वप्राणी संघ).
shaalaa.com
प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती : वापरलेले आधारभूत मुद्दे
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत?
आकृतीस योग्य नावे द्या.
प्राण्यांचे शरीर छोट्या छोट्या समान भागांत विभागलेले नसेल, तर अशा शरीराला खंडीभवन म्हणतात.
स्पाँजिला या प्राण्याच्या शरीरावर सूक्ष्म छिद्रे असतात. त्या छिद्रांना काय म्हणतात?
फसवी देहगुहा असणाऱ्या प्राण्याचे नाव लिहा?
द्विपार्श्व सममिती असलेला प्राणी ______ आहे.