English

‘रडू नकोस खुळे, उठ!आणि डोळ्यातले हे आसूसोडून दे शेजारच्या तळ्यातनि घेऊन ये हातातनुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’ या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा. -

Advertisements
Advertisements

Question

‘रडू नकोस खुळे, उठ!
आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा.

Answer in Brief

Solution

सुप्रसिद्ध कवयित्री हिरा बनसोडे यांनी या कवितेत स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्री ने या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना असून सहज आरशात पाहताना कवितेतील नायिकेच्या गावकाळाच्या स्मृती जागृत होऊन संवाद सुरू होतो तो अंतर्मनाचा प्रत्यक्ष मनाशी आणि अंतर्बाह्मा झालेला बदल दिसतो. चैतन्यमयी, अल्लड, बालपण, तेजस्वी तारुण्यामधली स्वप्ने, ध्येय कुठल्याकुठे गायब होतात. परंतु गतआयुष्याबद्दल आरशात पाहणाऱ्या स्त्रीला काहीच वाटत नाही, ती मागे वळून पाहते ते स्थितप्रज्ञाच्या भूमिकेतून. मात्र तिला इथे प्रश्न पडतो की आपल्यात ही स्थितप्रज्ञा आली कुठून?

बालपणी छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद कुठेतरी हरवल्याची तिला जाणीव होते. आरशातील स्त्री या व्यथांबद्दल भावना व्यक्त करत नसली तरी आरशाबाहेरील स्त्रीला म्हणजेच तिच्या प्रतिमेला आरशातील, स्त्रीची भावना अस्वस्थ करते. तिच्या मनाची चलबिचल स्थिती पाहून तिचे अंतर्मन आरशातील स्त्रीला सावरते, जवळ घेते आणि तितकेच अधिकारवाणीने ती तिला तिच्यातील नवचैतन्याची, जिद्दीची, आत्मविश्वासाची जाणीव करून देते. ती डोव्व्यातील आसवे तिला शेजारच्या तळ्यात सोडून देण्यास सांगते आणि याच तळ्यात उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले घेऊन येण्यास सांगते.

डोळ्यातील आसवे हे निराशेचे प्रतीक असून ही मनातील निराशा दूर फेकून देवून भवतालच्या अवकाशातून नवचैतन्य घेऊन पुन्हा एकदा आत्मविश्वासाने, जिद्दीने, सामर्थ्याने या सर्वांवर मात करावी हे नवउमेदीचे भान आरशाबाहेरील स्त्रीमध्ये म्हणजेच कवितेतील नायिकेमध्ये ‘आरशातील स्त्री’ नायिकेचे अंतर्मन जागृत करते. तिला उमेदीने जगण्यासाठी प्रेरित करते.

संवादात्मक शैलीतून कवयित्रीने केलेला हा भावनाविष्कार समाजव्यवस्थेतील स्त्रीच्या स्थानाविषयीची अनुभूती घडवतो. संसारामुळे गांजून गेलेली स्त्री ही स्वतःच्या मनाचा, इच्छेचा, स्वप्नांचा, ध्येयाचा कसा कोंडमारा करून घेते म्हणजेच तिला जर मानसिक व शारीरिक आधार मिळताच ती आपल्या मरगळलेल्या मनाची कात टाकून पुन्हा नवचैतन्याचे प्रेरित होऊन पुन्हा जिद्दीने कशी उभी राहते याची अनुभूती येते. डोळ्यातले आसू शेजारचे तळे, कमळाची फुले अशा शब्दप्रयोगामुळे आशयालाही गतिमानता प्राप्त होते. संवादातील तरलता अधिक प्रभावी व गहिरी होत जाते आणि स्त्री जाणीवेच्या मनातील विविध पैलू उलगडून स्त्री मनाशी एकरूप होतात. हेच कवितेचे आणि कवयित्रीचे यश म्हणावे लागेल.

shaalaa.com
आरशातली स्त्री
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×