Advertisements
Advertisements
Question
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
स्थळ गोखले नाट्यगृह, |
रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक नाट्य स्पर्धा दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८ वेळ - रात्री: ९:३० ते १२:३० प्रवेश - फक्त पासधारक* नियम व अटी लागू. |
नावनोंदणी |
तुमच्या नाटकासाठी | ||
तुमच्या मित्राला तुमचे नाटक पाहण्यास येण्याबाबत पत्र लिहा. |
Solution
दिनांक - १० नोव्हेंबर, २०१८
प्रिय मित्र,
सुमित यांस,
स. न. वि. वि.
मित्रा, बरेच दिवसांत काहीच खबरबात नाही. आता विशेष म्हणजे मिरज येथे रसिक नाट्य मंडळाने वर्धापन दिनानिमित्त दि. १६ ते २० डिसेंबर २०१८ पर्यंत ऐतिहासिक नाट्य स्पर्धा आयोजित केल्या असून त्यामध्ये आमच्या जय हनुमान नाट्य मंडळास प्रयोग करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तरी आमच्या मंडळाचे नाटक बघण्यासाठी तू दि. १७ डिसेंबरला, मिरज मधील गोखले नाट्यगृह इथे यावेस. प्रयोगाची वेळ रात्री ९.३० ते १२.३० आहे. तेव्हा कोणतीही सबब न सांगता तू ये. तुझी वाट पाहत आहे.
आई-बाबांना माझा नमस्कार सांग.
कळावे,
तुझा मित्र,
अनिल