Advertisements
Advertisements
Question
सागरी लाटांपासून विजनिर्मिती कशी केली जाते याची अंतराजलद्वारे माहिती मिळवा. आशा प्रकारे वीजनिर्मिती कोणकोणत्या ठिकाणी होते ते शोधा.
Solution
सागरी लाटांपासून वीजनिर्मिती करण्यासाठी लाटा चेंबरमध्ये पाण्याचा प्रवेश आणि बाहेर येण्याचा वापर केला जातो. यामुळे पाण्याचा स्तंभ वर-खाली हलतो आणि हवेवर पिस्टनसारखे काम करतो. या हालचालीमुळे हवा संकुचित आणि विघटित होते आणि वीजनिर्मितीसाठी पवन टर्बाइन जनरेटरद्वारे वाहिनी केली जाते.
वारंवार येणाऱ्या त्सुनामी लाटांमुळे आपल्याला आता समुद्राच्या लाटांची शक्ती चांगलीच माहिती झाली आहे. याच लाटांच्या शक्तीचा उपयोगसमुद्राच्या तळाशी टर्बाईन्स लावून ती फिरवून ऊर्जा निर्मितीसाठी केला जावू शकतो. समुद्री लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रकल्प उभे केले तर समुद्र जीवनाचाही ऱ्हास न होता उत्तम प्रकारे वीज निर्मिती केली जाऊ शकते.
वीज निर्मितीसाठी भरती-ओहोटीच्या लाटांमध्ये किमान काही मीटर उंचीच्या लाटांची गरज असते. पहिला प्रकल्प 'रिव्हर व रॅन्स' असून तो फ्रान्समध्ये इंग्लिश चॅनलमधील १४ मीटर उंचीपर्यंत उसळणाऱ्या लाटांचा वापर करून घेण्याच्या दृष्टीने उभारण्यात आला आहे.
२४० मेगावॅट निर्मिती क्षमतेचा हा प्रकल्प बऱ्यापैकी यशस्वी ठरला. भरतीच्या वेळी धरणाचे दरवाजे उघडण्यात येतात आणि ओहोटीच्या वेळी बंद करण्यात येतात. लाटा खाली कोसळतांना अडवलेले पाणी सोडून दिले जाते. त्यामुळे प्रत्येकी १३ मेगावॅट वीज निर्माण करतात.
आपल्याकडील पारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र राज्याला ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला असून या किनारपट्टी क्षेत्रातून अंदाजे ५०० मे.वॅ. इतकी वीजनिर्मिती करण्यास वाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यादृष्टिने विविध स्तरावर प्रयत्नदेखील करण्यात येत आहेत. अशाच प्रयत्नातून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोळथरे येथे समुद्री लाटांवरील वीज निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे.
नवी मुंबईतील खारघर येथील सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज व सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग-तंत्रनिकेतन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभा राहिला आहे. वाहत्या वार्याचा समुद्राच्या पाण्यावर दाब पडल्यामुळे समुद्रात लाटा निर्माण होतात. या लाटांची लांबी व उंची ही तेथील वातावरणावर अवलंबून असते. त्यात गतीज व स्थितीज अशी दोन प्रकारची ऊर्जा साठलेली असते. ही दोन्ही प्रकारची ऊर्जा संयुक्तरित्या साधारणपणे पाच किलोवॅट इतकी असते.