Advertisements
Advertisements
Question
सेंद्रिय शेतीमध्ये जैवकीटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा.
Solution
सेंद्रिय शेतीमध्ये जैवकीटकनाशकांचे महत्त्व:
-
रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे जमिनीचे प्रदूषण होते. फ्लुरासिटामाईडसारख्या रसायनांमुळे वनस्पती, प्राणी, आणि मानवांना मोठे नुकसान होते. यामुळे उपयुक्त आणि हानिकारक असे दोन्ही प्रकारचे जीव मोठ्या प्रमाणावर नष्ट होतात.
-
मात्र, जैवकीटकनाशके निरुपद्रवी जीवांसाठी विषारी नसतात आणि त्यांच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
-
जैवकीटकनाशके हे जैविक घटक असतात, ज्यांचा उपयोग रोगकारक घटकांचा नाश करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केला जातो.
-
कवक आणि जीवाणूंपासून मिळणाऱ्या टॉक्सिन्सला जैवतंत्रज्ञानाद्वारे थेट वनस्पतींमध्ये अंतर्भूत केले जाते. हे टॉक्सिन्स नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतात.
-
किण्वन प्रक्रियेत मिळणारे स्पायनोसॅड हे जैव कीटकनाशक म्हणून उपयोगी ठरते.