Advertisements
Advertisements
Question
शेजारील आकृतीत, रेषा l ही केंद्र O असलेल्या वर्तुळाला बिंदू P मध्ये स्पर्श करते. बिंदू Q हा त्रिज्या OP चा मध्यबिंदू आहे. बिंदू Q ला सामावणारी जीवा RS || रेषा l. जर RS 12 सेमी असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा.
Solution
वर्तुळाची त्रिज्या r मानू.
रेषा l ही वर्तुळाची P बिंदूत स्पर्शिका असून रेख OP ही त्रिज्या आहे. ......[पक्ष]
∴ रेख OP ⊥ रेषा l .....[स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]
जीवा RS || रेषा l ..........[पक्ष]
∴ रेख OP ⊥ जीवा RS
∴ QS = `1/2`RS ......[वर्तुळकेंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो.]
= `1/2 xx 12 = 6` सेमी
तसेच, OQ = `1/2`OP .....[बिंदू O हा OP चा मध्यबिंदू आहे.]
= `1/2` r
ΔOQS मध्ये, ∠OQS = 90° .......[रेख OP ⊥ जीवा RS]
∴ OS2 = OQ2 + QS2 .......[पायथागोरसचे प्रमेय]
∴ r2 = `(1/2 "r")^2 + 6^2`
∴ r2 = `1/4 "r"^2 + 36`
∴ r2 - `1/4 "r"^2` = 36
∴ `3/4 "r"^2 = 36`
∴ r2 = `(36 xx 4)/3` ∴ r2 = 48
∴ r = `sqrt(48)`
= `4sqrt3` सेमी ............[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
∴ दिलेल्या वर्तुळाची त्रिज्या `4sqrt3` सेमी आहे.