Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातु-गुणधर्म कमी होत जातो.
Solution
(१) धातूंमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते. इलेक्ट्रॉन दिल्याने धन प्रभारित आयन तयार होतात. यालाच धातुगुण म्हणतात.
(२) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते आणि इलेक्ट्रॉन वाढत जातात. केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने व अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयुजा-इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातु-गुणधर्म कमी कमी होत जातो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शास्त्रीय कारणे लिहा.
आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते.
आधुनिक आवर्तसारणीत गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे _____ व _____ अशी आहे.
खालीलपैकी आधुनिक आवर्तसारणीबाबत अचूक विधान कोणते?
मेंडेलिव्हची आवर्तसारणी : अणुवस्तुमान : : आधुनिक आवर्तसारणी : ______
गण १ व २ : एस खंड : : गण १३ व १८ : ______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
आधुनिक आवर्तसारणीत 1 ते 7 आवर्त आहेत.
पी - खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे.
व्याख्या लिहा.
आवर्त
कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करा:
(धातू, अधातू, धातूसदृश मूलद्रव्ये, चार, सात, एस-खंड, पी-खंड, डी-खंड, एफ-खंड)
इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण ______ खंडात विभाजन केले आहे. गण 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश ______ मध्ये आणि ते सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. (हायड्रोजन वगळून) गण 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश ______ मध्ये आहे. या खंडामधे धातू, अधातू आणि धातूसदृश मूलद्रव्यांचा समावेश आहे. गण 3 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश ______ खंडामध्ये आहे आणि ही सर्व मूलद्रव्ये ______ आहेत. आवर्तसारणीच्या तळाशी दाखवलेली लॅन्थेनाईड व ॲक्टेनाईड श्रेणीतील मूलद्रव्ये म्हणजे ______ खंड होय आणि ही सर्व मूलद्रव्ये धातू असतात.