Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा.
Answer in Brief
Solution
शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती खालीलप्रमाणे:
- कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण: ही कचरा व्यवस्थापनातील पहिली पायरी होय. कचऱ्यावरील पुढील प्रक्रियेसाठी सुका कचरा व ओला कचरा असे वर्गीकरण करणे खूप महत्त्वाचे असते.
- कंपोस्टिंग (सेंद्रिय खत): शिल्लक राहिलेले अन्न, स्वयंपाकघरातील कचरा, भाज्या व फळे यांच्या साली, बागेतील कचरा इत्यादींच्या विघटनाने चांगल्या प्रतीचे खत मिळू शकते.
- गांडूळ खत निर्मिती: या पद्धतीत, गांडुळाच्या मदतीने घनकचऱ्याचे विघटन जलद रीतीने केले जाते. गांडूळ खत निर्मितीतून मिळालेले खत हे पोषकद्रव्यांनी समृद्ध असल्याने शेतीसाठी उपयुक्त ठरते.
- सुरक्षित भूमीभरणाची पद्धती: या पद्धतीमध्ये, मानवी वस्तीपासून सुरक्षित दूर असलेल्या विशेष स्थानी कचरा ठेवून दिला जातो. अशा ठिकाणी जमिनीवर प्लॅस्टिकचे व चिकण मातीचे आवरण केले जाते, जेणेकरून कचऱ्यातील पाणी जमिनीत मुरत नाही.
- पायरोलिसिसः ही एक शास्त्रीय पद्धत असून त्यात कचऱ्याचे उच्च तापमानास ज्वलन केले जाते. या पद्धतीत जैववायूपासून विद्युतऊर्जा निर्मिती केली जाते.
- भट्टीतील ज्वलन/भस्मीकरण: ही एक औद्योगिक पद्धत आहे, ज्यात कचऱ्याचे साध्या घन अथवा वायूस्वरूपात रूपांतरित केले जातात. या पद्धतीमध्ये, भट्टीमध्ये कचऱ्याचे उच्च तापमानावर ज्वलन केले जाते. सामान्यपणे, जैविक वैद्यकीय कचऱ्यासाठी ह्या पद्धतीचा वापर होतो.
shaalaa.com
घनकचरा व्यवस्थापन
Is there an error in this question or solution?