Advertisements
Advertisements
Question
श्री हिरालाल यांनी 2,15,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्याचे 2 वर्षांनी त्यांना 3,05,000 रुपये मिळाले. श्री रमणिकलाल यांनी 1,40,000 रुपये 8% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांकरिता बँकेत गुंतवले. तर प्रत्येकाला झालेला शेकडा फायदा काढा. कोणाची गुंतवणूक अधिक फायदेशार झाली?
Solution
श्री हिरालाल यांची गुंतवणूक = ₹ 2,15,000
हिरालाल यांना मिळालेली रक्कम = ₹ 3,05,000
∴ हिरालाल यांचा फायदा = मिळालेली रक्कम − गुंतवणूक
= 305000 − 215000
= ₹ 90,000
∴ हिरालाल यांचा शेकडा फायदा = `90000/215000 xx 100`
= 41.86%
रमणिकलाल यांच्यासाठी,
P = 140000, R = 8%, n = 2 वर्षे
∴ चक्रवाढ व्याज = I = P `[(1 + R/100)^n - 1]`
= `140000 [(1 + 8/100)^2 - 1]`
= 140000 [(1 + 0.08)2 − 1]
= 140000 (1.1664 − 1)
= 140000 × 0.1664
= 23296
∴ रमणिकलाल यांना झालेला शेकडा फायदा = `23296/140000 xx 100`
= 16.64%
म्हणून श्री हिरालाल यांची गुंतवणूक अधिक फायदेशार झाली.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रुपयांची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा.
सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाद्यपदार्थांचा व्यवसाय चालू केला. त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला, त्यात त्याला 5% नफा झाला. तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती तोटा किंवा नफा झाला?
निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाचा 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, 14% भाग शेअर्समध्ये गुंतवला, 3% भाग बँकेत ठेवला आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला. गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये उरले. तर त्याचे मासिक उत्पन्न काढा.
सय्यदभाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांकरिता बँकेत गुंतवले. श्री फर्नांडीस यांनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षांकरिता गुंतवले. 2 वर्षांनंतर श्री फर्नांडीस यांना 1,92,000 रुपये मिळाले. तर सय्यदभाई व श्री फर्नांडीस यांपैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली?
समीराने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाजकार्यासाठी दिले व 90% उत्पन्न खर्च केले. तिच्याकडे 1750 रुपये शिल्लक राहिले. तर तिचे मासिक उत्पन्न काढा.
श्री शेखर उत्पन्नाच्या 60% खर्च करतात. त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून 300 रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात तेव्हा त्यांच्याकडे 3,200 रुपये उरतात, तर त्यांचे उत्पन्न काढा.
एका बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला 24,000 रुपये होते. त्यामध्ये 56,000 रुपयांची भर घातली व ती सर्व रक्कम 7.5% दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली. तर 3 वर्षांनंतर एकूण किती रक्कम परत मिळेल?
श्री मनोहर यांनी आपल्या उत्पन्नाचा 20% भाग आपल्या मोठ्या मुलाला आणि 30% भाग धाकट्या मुलास दिला. नंतर उरलेल्या रकमेच्या 10% रक्कम देणगी म्हणून शाळेला दिली. तेव्हा त्यांच्याकडे 1,80,000 रुपये उरले. तर श्री मनोहर यांचे उत्पन्न काढा.
कैलासचा उत्पन्नाच्या 85% इतका खर्च होत असे. त्याचे उत्पन्न 36% वाढले तेव्हा त्याचा खर्च पूर्वीच्या खर्चाच्या 40% वाढला. तर त्याची आता होणारी शेकडा बचत काढा.
रमेश, सुरेश आणि प्रीती या तिघांचेही एकूण वार्षिक उत्पन्न 8,07,000 रुपये आहे. ते तिघे आपल्या उत्पन्नाचा अनुक्रमे 75%, 80% आणि 90% भाग खर्च करतात. जर त्यांच्या बचतींचे गुणोत्तर 16 : 17 : 12 असेल तर प्रत्येकाची वार्षिक बचत काढा.