Advertisements
Advertisements
Question
सखोल धान्यशेतीची माहिती लिहा.
Answer in Brief
Solution
कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेतीप्रकार म्हणजे सखोल शेती.
- जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते.
- या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते.
- या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते.
- या प्रकारातील शेतकरी व त्याचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते. शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते.
- शेतीमध्ये प्राणिज ऊर्जेचा वापर जास्त होतो.
- अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 7.3: कृषी - स्वाध्याय [Page 166]