Advertisements
Advertisements
Question
समजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर, एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? का?
Short Note
Solution
वस्तू जमिनीवरून ओढून नेताना वस्तू व जमिनीचा पृष्ठभाग यांमधील घर्षणबलाविरुद्ध कार्य करावे लागते. हे घर्षणबल वस्तूच्या वजनाशी समानुपाती असते. वस्तूचे वजन = mg.g चे मूल्य अचानक दुप्पट झाले, तर वस्तूचे वजनही दुप्पट होईल. परिणामी वस्तू व जमिनीचा पृष्ठभाग यांमधील घर्षणबल पण दुप्पट होईल. त्यामुळे ती जड वस्तू जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल.
shaalaa.com
‘G’ च्या मूल्यात होणारे बदल
Is there an error in this question or solution?