English

संयुक्त राष्ट्रांच्या घटकशाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. क्र.1. शाखा आमसभा 2.सुरक्षा समिती 3. आंतरराष्ट्रीय न्यायालय 4. आर्थिक व सामाजिक परिषद - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

संयुक्त राष्ट्रांच्या घटकशाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा.

क्र. शाखा सदस्य संख्या कार्ये
१. आमसभा    
२. सुरक्षा समिती    
३. आंतरराष्ट्रीय न्यायालय    
४. आर्थिक व सामाजिक परिषद    
Chart

Solution

क्र. शाखा सदस्य संख्या कार्ये
१. आमसभा १९३
  • सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्यांची निवड करणे.
  • सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे.
  • संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे.
२. सुरक्षा समिती

१५ (५ सदस्य कायम, १० सदस्य अस्थायी)

  • आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे ही सुरक्षा परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे. 
  • शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करण्याचे काम सुरक्षा परिषद करते.
  • आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्रांचा महासचिव निवडण्यात सुरक्षा परिषदेचा सहभाग असतो.
३. आंतरराष्ट्रीय न्यायालय १५ न्यायाधीश
  • संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असलेल्या दोन किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवणे.
  • आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ लावणे.
  • संयुक्त राष्‍ट्रे संघटनेच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्थांना कायद्याशी संबंधित प्रश्नांवर सल्ला देणे.
४. आर्थिक व सामाजिक परिषद ५४ सदस्य
  • दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे.
  • स्त्रियांचे प्रश्न, स्त्री सक्षमीकरण, मानवी हक्क, मूलभूत स्वातंत्र्य, जागतिक व्यापार, आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेणे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे.
  • संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या विविध संघटनांच्या कामात सुसूत्रता व समन्वय राखणे.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रांची रचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.4: संयुक्त राष्ट्रे - स्वाध्याय [Page 83]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2.4 संयुक्त राष्ट्रे
स्वाध्याय | Q ५. (१) | Page 83
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×