English

स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

महिलांची एकजूट समाजातील विविध घटकांमध्ये सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, उदाहरणार्थ:
  1. लाटणे मोर्चा (१९७२): समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. ऐन दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तूमिळत नव्हत्या. रॉकेल महाग झाले होते. यामुळे महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले.
  2. चिपको आंदोलन (१९७३): व्यापारी उद्देशासाठीच्या जंगलातील झाड तोडी रोखण्यासाठी चिपको आंदोलनात महिलांनी सक्रिय सहभाग घेतला आणि एकमेकांचे हात धरून त्यांना वेढून ठेवले. गौरादेवी या कार्यकर्तीने स्त्रियांमध्ये जागृती केली. त्यांना सुदेशादेवी, बचनीदेवी यांची मदत मिळाली.
  3. मद्यपानविरोधी आंदोलन (१९९२): आंध्र प्रदेशात महिलांनी दारूच्या वाढत्या समस्यविरुद्ध आवाज उठवला आणि राज्य सरकारने त्यांना साथ दिली.

ही आंदोलने खूप यशस्वी झाली आणि महिला एकजूट झाल्या तर समाजात सकारात्मक बदल कसे घडवून आणू शकतात हे कळले.

shaalaa.com
स्त्रीशक्तीचा आविष्कार
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.06: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण - स्वाध्याय [Page 36]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1.06 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
स्वाध्याय | Q ५. | Page 36
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×