Advertisements
Advertisements
Question
सूचनाफलक दि. २३/०९/22 समर्थनगर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. समर्थनगर परिसरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा. पाणीपुरवठा विभाग, |
वरील सूचनाफलकाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे?
- पाणीपुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे?
- पाणीपुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे?
- पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे?
Short Answer
Solution
- ही सूचना दिनांक २३ सप्टेंबर २०१७ या तारखेला देण्यात आली आहे.
- पाणीपुरवठा दिनांक २४ सप्टेंबर २०१७ रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.
- समर्थनगर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याने, पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
- उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा अशी सूचना नागरिकांना देण्यात आली आहे.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?
Chapter 5.2: आम्ही सूचनाफलक वाचतो. - स्वाध्याय [Page 17]