Advertisements
Advertisements
Question
सुगीच्या दिवसांतील शेतातील धान्य, फुले, फळे यांचे महत्त्व सांगा.
Solution
पावसापूर्वी नांगरून ठेवलेल्या जमिनीत पावसाला सुरुवात झाली की शेतकरी बियाणे पेरतो. काबाडकष्ट करून, दिवसरात्र मेहनत करून तो पीक घेतो. जेव्हा शेतामध्ये धान्य उगवून येते, तेव्हा शेतकऱ्याला अति आनंद होतो. कारण त्याने केलेल्या कष्टाचे फळ त्याला मिळालेले असते. या शेतातील धान्यावर त्याचे व त्याच्या कुटुंबीयांचे पोट भरत असते. वर्षभराची त्याची चिंता संपते. तसेच फुले व फळे बहरून आली की त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे सुगीचे दिवस त्याच्या नशिबात सोन्याचे दिवस असतात. अशा प्रकारे शेतातील धान्य, फळे व फुले यांचे महत्त्व खूप आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारण शोधा.
सुगी आली, कारण ______
कारण शोधा.
शेतकऱ्याला कमतरता नाही, कारण ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
शेतकऱ्यावर कृपा करणारा - ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
नवनवतीचा साज ल्यालेली - ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
शेतकऱ्याच्या साथीला असणारे - ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
दैवाने दिलेली दौलत - ______
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
काळ्या मातीला हिरवा सुगंध
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
धनी आम्हीच आमचं हे राजं
शेतकऱ्याला झालेला आनंद तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
(भल्लगडी दादा) कवितेतील ‘दौलत’ या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.