Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो ।’ असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.
Solution
जेव्हा जेव्हा देशावर शत्रूचे आक्रमण होते किंवा अतिरेक्यांचे हल्ले होतात, तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते. सैनिकांबद्दलचे प्रेम उफाळून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्याच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंनी लोक उपस्थित राहतात. एरव्ही सर्व नागरिक आपापल्या सुखात मशगुल असतात. देशावर प्रेम करायचे म्हणजे नाटक, सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे किंवा १५ ऑगस्ट – २६ जानेवारीला झेंडावंदन करायचे. शेवटी, मूठ वळलेला हात हवेत उंचावून 'भारतमाता की जय' असे जोरात म्हणायचे! हीच देशभक्ती! आपली देशभक्ती कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे.
वीरमरण आलेल्या सैनिकाच्या आईचे उद्गार सर्व देशवासीयांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. ती आई सर्वांना देशावर थोडे तरी प्रेम करा, असे विनवीत आहे. देशावर प्रेम करणे याचा खरा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे.
देशावर प्रेम करायचे म्हणजे देशाचे भले चिंतायचे, देशाचे ज्या ज्या गोष्टीत भले होते, त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी देशाला हानिकारक आहेत त्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. आता हेच बघा ना - काही काळापूर्वी कोरोनाचा कहर चालू झाला होता. लागलीच नाक-तोंड झाकायचा पाच रुपयांचा मास्क पंचवीस रुपयांना विकला जाऊ लागला. ताबडतोब काळाबाजार सुरू. काही समाजकंटक वापरलेले मास्क इस्त्री करून विकत होते. दुधात भेसळ, अन्नधान्यात भेसळ, भाज्या तर १५० २०० रुपयांना किलो अशा सुद्धा विकल्या गेल्या होत्या. लोक लाच घेतात. कामात घोटाळे करतात. कोणतेही काम प्रामाणिकपणे करीत नाहीत. त्यामुळे उत्पादने वाईट निर्माण होतात. सेवा चांगल्या मिळत नाहीत. हे सर्व देशाचेच नागरिक ना? असे केल्याने देशाची प्रगती कशी होईल?
सगळ्यांनी प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करणे ही देशभक्ती आहे. हेच देशावर प्रेम आहे. विद्यार्थ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच सचोटीने कामे केली तर देशाची प्रगती होईल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
काव्यसौंदर्य.
कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्ये
काव्यसौंदर्य.
लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट
काव्यसौंदर्य.
लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट
चौकटीत उत्तरे लिहा.
भयाण पर्वतांवर चढणार __________________
चौकटीत उत्तरे लिहा.
मृत्यूलाच आव्हान देणारी __________________
चौकटीत उत्तरे लिहा.
कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी __________________
चौकटीत उत्तरे लिहा.
चोवीस जणांची लडाख भेट __________________
कारणे लिहा.
थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’च्या स्मारकाला सलाम केला, कारण...
कारणे लिहा.
‘मिशन लडाख’ साठी ‘राखी पौर्णिमे’चा मुहूर्तनिवडला, कारण...
कारणे लिहा.
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण...
पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.
एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.
पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.
‘सेवा परमो धर्म:’
पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.
गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.
पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.
लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.
स्वमत.
ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी, ते स्पष्ट करा.
स्वमत.
‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
अभिव्यक्ती.
कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है ।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) (२)
दृक-श्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे |
(य) _________ |
(र) _________ |
(२) (२)
कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभा समोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्ये |
(य) _________ |
(र) _________ |
मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंगं होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, ह्याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल-युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!” चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. आणि त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली - “शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्द नाहीत, तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्यदलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवनं गाईन आणि निदान पुढील पाच वर्ष नागरिकांना सोबत घेऊन ह्या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन.” |
(३) स्वमत अभिव्यक्ति - (४)
शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत लिहा.