Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
कवितेतून व्यक्त झालेला 'रंगारी श्रावण' तुम्हांला का आवडला ते तुमच्या शब्दांत सांगा.
Short Answer
Solution
निसर्गामध्ये रंगाची उधळण करणाऱ्या श्रावणाला कवींनी रंगारी म्हटले आहे. हा रंगारी श्रावण प्रत्येक माणसाला भुरळ घालणारा आहे. हा सृष्टीचा चित्रकार वाटतो कारण त्यांचे प्रत्येक क्षणी, विविध ठिकाणी रंग वेगळे दिसतात, त्याचे रूप वेगवेगळे होते. त्याच्या कलाकृतींनी तो सृष्टीत विविध कशिदा काढत राहतो. श्रावण महिन्यात डोंगरदरीतून, ओढ्यातून जलप्रवाह खळखळ वाहत असतात. हिरवाईने निसर्ग नटलेला असतो, वेली जोमाने वाढलेल्या असतात. अनेक सण उत्सव या महिन्यात येतात त्यामुळे आनंदाला उधाण आलेले असते. उनपाऊस यांचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो त्यामुळे सगळ्यांची धावपळ होत असते. असा हा रंगांचा जादुगार असलेला श्रावण मला खूप आवडतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?