Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
मॉरिशसला बहुरंगी निसर्गसौंदर्य लाभले आहे, याविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
Solution
मॉरिशस हे दर्यातील एक सुंदर साखरबेट आहे. चोहीकडे उसाचे हिरवे मळे आहेत. निळ्या पाण्याच्या समुद्राने ते वेढले आहे. मॉरिशसमधील घरे होडीच्या आकाराची आहेत. भारतीय घरांपुढे गर्द हिरव्या पानांनी सुशोभित झालेली पिवळ्या केळ्याची बाग आहे. घराच्या भिंतींना पांढरा रंग आहे. वर हिरवी, निळी, लाल छपरे आहेत. घरापुढे सुंदर फुलझाडांचे रंगीबेरंगी परसू (परसदार) आहे. त्या परसूत निळ्या पाण्याचे तळे व तळ्यात लाल-निळी कमळे फुललेली असतात. हा सर्व रंगांचा बहर पाहिला की असे म्हणावेसे वाटते की, मॉरिशसला बहुरंगी निसर्गसौंदर्य लाभले आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या घटना कालानुक्रमाने लावा.
- मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले.
- पहिला भारतीय मॉरिशसमध्ये पोहचला.
- मॉरिशसला डच पोहोचले.
- ब्रिटिशांनी फ्रेंचांकडून मॉरिशस बेट जिंकले.
आकृतिबंध पूर्ण करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
भारतीय लोक जेथे उतरले तो घाट -
भारतीय वंशाच्या लोकांचे मॉरिशसमधील प्रमाण -
घराला भारतीयत्व देणारी गोष्ट -
मॉरिशसची राजधानी -
मॉरिशसमध्ये असलेले छोटे बेट -
मॉरिशसच्या घरांचा आकार -
खालील तक्ता पूर्ण करा.
अ. क्र. | एकवचन | अनेकवचन |
(१) | शहर | |
(२) | नदी | |
(३) | पाऊल | |
(४) | डोंगर |
खालील शब्दांचे लिंग ओळखा व तक्ता पूर्ण करा.
अ. क्र. | शब्द | लिंग |
(१) | साखरबेट | |
(२) | होडी | |
(३) | घुमट | |
(४) | पृथ्वी |
स्वमत.
(मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट) या पाठातील तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका गोष्टीचे वर्णन करा.