Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
संध्याकाळच्या सौंदर्याचे वर्णन कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत करा.
Solution
संध्याकाळी सूर्य मावळतो आहे. त्याची सोनेरी, पिवळी- तांबूस किरणे चहूकडे पसरली आहेत. ओढा जणू आपल्या पाण्यातून सोने वाहून नेतो आहे, असे वाटते. झाडांनी जणू डोक्यावर सोनेरी मुकुट घातला आहे. कुरणांवर गुलाल पसरला आहे. हिरवेगार भाताचे शेत म्हणजे जणू झोके घेणारे हिरवे गालिचेच आहेत. इंद्रधनुष्याच्या रंगांचे, सोनेरी, रुपेरी, मखमली पंख असलेली फुलपाखरे भाताच्या शेतावर भिरभिरत आहेत व काही साळीवर पाळण्यात झुलत आहेत. सुळकन् इकडून-तिकडे जाणाऱ्या फुलपाखरांना जणू हिरे, माणके व पाचूचे पंख फुटले आहेत. सर्व पक्षी चारापाणी घेऊन आता संध्याकाळी झाडावर गोळा झाले आहेत. सर्व सृष्टी सुंदर करणारा सोन्याचा गोळा म्हणजे सूर्य, हळूहळू मावळत चालला आहे. अवकाशात बुडून गेला आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
‘इंद्रधनुष्य’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खालील संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर | (१) कुरणावर, शेतात पसरलेला गुलाबी रंग म्हणजे जणू गुलाल ! |
(आ) कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी | (२) फुलपाखरांचे सुंदर विविधरंगी पंख म्हणजे जणू हिरे, पाचू, माणकं! |
(इ) झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे ! | (३) ओढ्यातील वाहते सोनेरी पाणी म्हणजे जणू सोने ! |
(ई) हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती ! | (४) साळीची शेते म्हणजे झोके घेणारे जणू हिरवे गालीचे ! |
कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा.
कवितेच्या आधारे रिकामी जागा भरा.
सोनेरी मुकुट घालणारी - ______
कवितेच्या आधारे रिकामी जागा भरा.
साळीवर झोपणारी - ______
कवितेच्या आधारे रिकामी जागा भरा.
सोन्याचा गोळा - ______
स्वमत.
सूर्योदयाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.