English

थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा.

Short Note

Solution

पाण्याची घनता 4°C ला उच्चतम असते. थंड प्रदेशातील तलावांमध्ये जेव्हा पाण्याचे तापमान कमी होऊ लागते, त्या वेळी 4°C तापमानाचे पाणी तळाशी राहते आणि त्याहून कमी तापमानाचे पाणी व ते गोठून बनलेले बर्फ पृष्ठभागावर राहते. पाणी व बर्फ हे उष्णतेचे दुर्वाहक असल्याने तळाशी असलेल्या पाण्यावर बाहेरच्या थंडीचा फारसा परिणाम होत नाही व त्यामुळे त्या पाण्यामध्ये तलावातील जलीय वनस्पती व जलचर सुरक्षित राहतात.

थंड प्रदेशातील पाण्यातील सजीव

shaalaa.com
पाण्याचे असंगत आचरण (Anomalous behaviour of water )
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: उष्णता - स्वाध्याय [Page 71]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 5 उष्णता
स्वाध्याय | Q ६. अ. | Page 71

RELATED QUESTIONS

खालील आलेखाचे निरीक्षण करा. पाण्याचे तापमान 0°C पासून वाढवत नेल्यास त्याच्या आकारमानात होणारा बदल विचारात घेऊन पाणी व इतर पदार्थ यांच्या आचरणात नक्की काय फरक आहे ते स्पष्ट करा. पाण्याच्या या प्रकारच्या आचरणास काय म्हणतात?


‘पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडक फुटून त्याचे तुकडे होतात’ हे वाक्य स्पष्ट करा.


हवेतील दमटपणा किंवा कोरडेपणा _____ वर अवलंबून नसतो.


पाण्याचे तापमान 4°C पेक्षा कमी झाल्यास तिचे आकारमान _____.


थंड प्रदेशातील जलीय प्राणी 4°C तापमानास जिवंत राहू शकतात कारण...


पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी _____ याचा उपयोग करतात.


पाण्याच्या असंगत आचरण अभ्यासात होपच्या उपकरणात वरच्या तापमापीचे तापमान : 0°C : : खालच्या तापमापीचे तापमान : _____


नावे लिहा.

पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास ज्या उपकरणाच्या साहाय्याने केला जातो.


होपच्या उपकरणाची नामनिर्देशित आकृती काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×