English

टीप लिहा. बांडुंग परिषद - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

टीप लिहा.

बांडुंग परिषद

Short Note

Solution

  1. भारताने १९४७ मध्ये पहिली आशियाई परिषद घेतली. त्या परिषदेत आशियातील २५ राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेत झालेल्या चर्चेतून आशियाई प्रादेशिकतावादाची संकल्पना आकाराला आली.
  2. आशियातील जनतेचे प्रश्न, आशियाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांकडे लक्ष वेधणे व परस्पर सहकार्यावर भर देण्यासंबंधी विचार-विनिमय झाला.
  3. या पार्श्वभूमीवर १९५५ मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली.
  4. या परिषदेत आफ्रो-आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले.
  5. बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या आशिया-आफ्रिका खंडांतील जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली.
shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आफ्रिका
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: जग : निर्वसाहतीकरण - स्वाध्याय [Page 69]

APPEARS IN

Balbharati History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 9 जग : निर्वसाहतीकरण
स्वाध्याय | Q ३.१ | Page 69
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×