Advertisements
Advertisements
Question
टीप लिहा.
भारत सरकारचे युवक धोरण
Short Note
Solution
- भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश असल्याने या युवकांना शिक्षणाच्या संधी, कौशल्य उपलब्ध करून दिल्यास हा युवा वर्ग भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो.
- या हेतूनेच १९७२ मध्ये 'नेहरू युवा केंद्र संघटना' ही संस्था स्थापन करण्यात येऊन युवकांना प्रशिक्षण देणे सुरू केले गेले. पुढे 'राष्ट्रीय युवा सशक्तिकरण कार्यक्रम' अंतर्गत साक्षरता, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता, स्वयंरोजगार, पर्यावरण संरक्षण इत्यादी विषयांवर भर देण्यात आला.
- १२ जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून पाळला जाऊ लागला. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
- युवकांच्या साहसी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने भारतभर ८३ वसतिगृहे स्थापन केली. त्यामुळे युवा पर्यटन वाढले. एन. सी. सी., स्काऊट आणि गाईड यांच्या माध्यमांतून युवा वर्गाला सेवा, स्वयंशिस्त इत्यादी गुणांचे धडे दिले जातात.
- एकूणच युवक अधिकाधिक सक्षम, सेवाभावी व कुशल कसे होतील या दृष्टीने भारत सरकार आपले धोरण राबवीत आहे.
shaalaa.com
युवकांसंदर्भातील धोरण
Is there an error in this question or solution?