Advertisements
Advertisements
Question
टीप लिहा.
फौजदारी कायदा
Short Note
Solution
गंभीर स्वरूपाचे गुन्हेफौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. उदा., चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या, इत्यादी. या गुन्ह्यांबाबत प्रथम पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला जातो. पोलीस त्याचा तपास करतात आणि नंतर कोर्टात खटला दाखल होतो. गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेचे स्वरूपही गंभीर असते.
भारतातील न्यायव्यवस्थेचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. सामान्य माणसाच्या मनातही न्यांयव्यवस्थेबाबत आदर असून त्यावर विश्वास आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचे, संघराज्याचे, संविधानाचे संरक्षण भारतातील न्यायव्यवस्थेने केले आहे. भारतातील लोकशाही बळकट करण्यात न्यायालयाचा मोठा वाटा आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 5.4: भारतातील न्यायव्यवस्था - स्वाध्याय [Page 129]