Advertisements
Advertisements
Question
टीप लिहा.
प्लॅस्टिकचे उपयोग
Short Note
Solution
- मेलामाइन: घरगुती उपयोगासाठी कप, बशा, प्लेट्स, ट्रे यांसाठी वापरले जाते. विमानाच्या इंजिनचे सुटे भाग आणि ध्वनी-प्रत्यावरणासाठी वापरले जाते.
- पॉलीयुरेथेन: सर्फिंग बोर्ड, लहान बोटी, फर्निचर, आणि वाहनांच्या सीट्ससाठी वापरले जाते.
- बॅकेलाइट: रेडिओ, टी.व्ही., टेलिफोनच्या बॉडीसाठी, विद्युत स्विच, खेळणी आणि कुकरच्या हँडलच्या कोटिंगसाठी वापरले जाते.
- पॉलिस्टर: फायबरग्लास, लेझर प्रिंटरचे टोनर आणि कापड उद्योगामध्ये वापरले जाते.
- पॉलीप्रोपिलीन: लाउडस्पीकर आणि वाहनांचे भाग, दोऱ्या, गाद्या, प्रयोगशाळेतील उपकरणांसाठी वापरले जाते.
- पॉलीइथिलीन: दूधाच्या पिशव्या, पॅकिंग बॅग, लवचिक गार्डन पाईप्स यासाठी वापरले जाते.
- पॉलिस्टायरीन: थर्मल-इन्सुलेशनसाठी, मशीनचे गिअर्स, खेळणी, सीडी/डीव्हीडी कव्हर यांसाठी वापरले जाते.
- पॉलीव्हिनायल क्लोराईड: बाटल्या, पावसाचे कोट, पाईप्स, हँडबॅग्स, बूट, इलेक्ट्रिक केबल इन्सुलेशन, फर्निचर, दोऱ्या, खेळणी इत्यादींसाठी वापरले जाते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?