Advertisements
Advertisements
Question
टीपा लिहा.
खेळणी आणि उत्सव.
Short Note
Solution 1
उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे.
- विविध संस्कृतीत आणि धर्मांत उत्सवप्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते.
सांताक्लॉज नाताळ मध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो. - दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात, ती खेळणीच असतात.
- गावोगावच्या जत्रा व उत्सवप्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात.
- बैलपोळा, नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात. संक्रांतीच्या दिवशी मुले पतंग उडवतात.
shaalaa.com
Solution 2
- लहान मुलांच्या करमणुकीकरता व शिक्षणाकरता जी रंगीबेरंगी विविध प्रकारची साधने व उपकरणे असतात, त्यांना खेळणी असे म्हणतात.
- काही खेळणी विशिष्ट उत्सवांच्या दरम्यान वापरली जातात.
- या खेळण्यांच्या अभ्यासातून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा माहीत होतात.
- महाराष्ट्रामध्ये दिवाळीत किल्ले करण्याची फार मोठी परंपरा आहे. मातीचे किल्ले तयार करून त्यावर शिवाजी महाराज व मावळ्यांच्या प्रतिमा ठेवल्या जातात. हा एक प्रकारचा खेळच आहे, ज्याद्वारे महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा मिळतो.
shaalaa.com
खेळांचे साहित्य आणि खेळणी
Is there an error in this question or solution?