Advertisements
Advertisements
Question
टिपा लिहा.
ॲमेझॉन नदीचे खोरे
Short Note
Solution
- ॲमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वांत मोठा मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानाचा) सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.
- ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद, म्हणेजच सुमारे १३०० किमी रुंद आहे. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तेथे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ २४० किमी होते.
- जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते, तसतशी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची (मैदानाची) रुंदी वाढत जाते.
- ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) प्रदेश दुर्गम बनला आहे.
shaalaa.com
ब्राझीलची जलप्रणाली
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ________.
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत __________.
पँटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?
टिपा लिहा.
ब्राझीलची किनारपट्टी
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.
भौगोलिक कारणे लिहा.
ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.
अचूक गट ओळखा:
ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.
अचूक गट ओळखा:
ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.
ब्राझीलच्या पश्चिम भागात कोणत्या नदीचे खोरे आहे?
खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती?
- ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते?
- उरुग्वे नदी कोणत्या दिशेकडे वाहते?
- साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरास येऊन मिळते?
- उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव लिहा.
वेगळा घटक ओळखा:
अमेझॉन नदीच्या उपनद्या