Advertisements
Advertisements
Question
टीपा लिहा.
प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
Solution 1
मुद्रित माध्यमे; इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात.
- वृत्तपत्रांत अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक,संपादक हवे असतात,
- बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते.
- या सर्व माध्यमांतून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते.
Solution 2
वर्तमानपत्रे, आकाशवाणी आणि दूरदर्शन ही महत्त्वपूर्ण प्रसारमाध्यमे आहेत. या माध्यमांनुसार संबंधित व्यावसायिक क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. वर्तमानपत्रांमधील विविध सदरे, अग्रलेख, दिनविशेष, बातम्या मांडण्यासाठी एखाद्या बातमीमागील बातमी सांगणेही महत्त्वाचे असते, यासाठी, तसेच इतिहासाची साधने व इतिहासावर संबंधित सदरांकरता इतिहासकारांची मदत आवश्यक असते.
२. वर्तमानपत्रे काही विशेषप्रसंगी पुरवण्या अथवा विशेषांक काढतात. उदा. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाला २०१७ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली, तसेच पहिल्या महायुद्धाला २०१४ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली, अशावेळी त्या संपूर्ण घटनेचा आढावा देण्याकरता इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते.
३. राष्ट्रीय नेत्यांची जयंती व पुण्यतिथी किंवा ऐतिहासिक घटनेला विशिष्ट वर्षे पूर्ण होणे यांसारखे दिनविशेष कार्यक्रम आकाशवाणीवर प्रसारित होतात, त्यावेळी त्या नेत्यांच्या कार्याविषयक किंवा घटनेविषयक माहिती इतिहासाच्या आधारे सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज भासते.
४. दूरदर्शनवरील ऐतिहासिक मालिकांची निर्मिती करण्यासाठी तत्कालीन वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, भाषा, राहणीमान यांकरता इतिहास तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते.
५. तसेच हिस्ट्ररी, डिस्कव्हरी यांसारख्या खाजगी वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये इतिहासातील काही निवडक भागांचे नाट्यमय सादरीकरण केले जाते; याशिवाय वास्तू, किल्ले, साम्रज्य, पाककला यांचा इतिहास सांगितला जातो. यासाठीही इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे असते.
वरील विवेचन लक्षात घेता इतिहासाच्या ज्ञानामुळे प्रत्येक प्रसारमाध्यमामध्ये व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकते, हे स्पष्ट होते.
RELATED QUESTIONS
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
डिस्कव्हरी ऑफ इंडिया भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे. पंडित नेहरू यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण- महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशाह यांचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाजसुधारक चळवळी आणि स्वातंत्र्यसंग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या. या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यांमुळे ही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली. |
१. भारत एक खोज ही मालिका कोणत्या ग्रंथावर आधारित होती?
२. भारत एक खोज या मालिकेत नेहरूंची भूमिका कोणी वठवली?
३. भारत एक खोज ही मालिका संपूर्ण भारतभर का वाखाणली गेली?