Advertisements
Advertisements
Question
टीपा लिहा.
शहरीकरण
Short Note
Solution
- शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रीत होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात.
- नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक महत्त्वाचे कारण आहे. हवा, पाणी, समूहजीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक नागरीकरणावर परिणाम घडवून आणतात.
- स्वातंत्र्योत्तर भारताच्या संदर्भात नागरी लोकसंख्या वाढीची काही प्रमुख कारणे म्हणजे मृत्युदरातील घट, औद्योगिकीकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, शहरातील रोजगार संधी व व्यापार, स्थलांतर ही होत.
- शहरांवर येणारा हा ताण थांबवायचा असल्यास छोट्या-छोट्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणे, आर्थिक विकासाचा समतोल साधणे, आर्थिक विकासाला चालना देणे, महानगरांची वाढ नियंत्रित करणे, ग्रामीण व नागरी भागांत आवश्यक सेवा व सुविधा पुरवणे हे उपाय आहेत.
shaalaa.com
शहरीकरण
Is there an error in this question or solution?