Advertisements
Advertisements
Question
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृत्या पूर्ण करा. (२)
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ___________
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे - ___________
2. सत्य विधान ओळखा. (२)
- बाबासाहेब निघाले तेव्हा सूर्यफुलांनी त्यांचे स्वागत केले.
- बाबासाहेब बोलक्या जिवांचे नायक झाले.
- चवदार तळ्यावर बाबासाहेबांनी गुलामांच्या पायात बेड्या चढवल्या.
- विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला.
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
3. ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)
'तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत' या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
4. विचार साैंदर्य लिहा. (२)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
1.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - मळवाट
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे - खाचखळगे
2. विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला.
3. बिकट परिस्थितीवर स्वार होऊन तू नवा इतिहास घडवलास. मूक बनून जगणाऱ्या समाजाचा, तू नेता बनलास आणि बहिष्कृत केलेल्या समाजाला तू जागृत केलेस.
4. 'तू झालास मूक समाजाचा नायक' या कवितेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पन्नास वर्षांपूर्वी आपल्या अनुयायांसह महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह घडवून आणला, त्याविषयी त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या कार्याचे वर्णन यात केले आहे. ज्या समाजाने न्यायाचा, ज्ञानाचा प्रकाश कधी पाहिलाच नव्हता, अशा समाजाला त्यांनी जागे केले. या मुक्या समाजाला वाचा दिली. अन्यायाविरुद्ध विद्रोह करण्याची, अन्यायाला, अज्ञानाला नकार देण्याची वृत्ती निर्माण केली. पारंपरिक वाटेला नकार देत, विषम सामाजिक व्यवस्थेला नाकारले आणि नव्या समाजाचा पाया उभारला.
दलित बांधवांना चवदार तळ्याचे पाणी नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी, मानवी हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी हा लढा उभा केला. या बांधवांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना माणूस म्हणून जगता यावे यासाठी आंबेडकरांनी आपले आयुष्य वेचले. आपल्या अगाध ज्ञानाचा वापर त्यांनी समाजाकरता केला. त्यांचे हे असामान्य कर्तृत्व या कवितेतून नेमकेपणाने मांडले आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______
आकृती पूर्ण करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______.
आकृती पूर्ण करा.
कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा.
कवितेतील संदर्भ | स्पष्टीकरण |
(१) मळवाट | (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज |
(२) खाचखळगे | (आ) पारंपरिक वाट |
(३) मूक समाज | (इ) अडचणी, कठीण परिस्थिती |
चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.
चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.
पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती | पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती |
____________ | ____________ |
____________ | ____________ |
____________ | ____________ |
‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून (तू झालास मूक समाजाचा नायक) जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.
अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
'तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.'
पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
- दोन शब्दांचे अर्थ (२)
अ) डचमळणे -
ब) रणशिंग -
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायेत,
बिगूल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय.
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. चौकटी पूर्ण करा: (2)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
2. आकृतिबंध पूर्ण करा: (2)
3. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा: (2)
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
4. काव्यसौंदर्यः (2)
'आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.'
या ओळींतील विचारसौदर्य स्पष्ट करा.