English

तुमचे मत नोंदवा. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वा. सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

तुमचे मत नोंदवा.

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वा. सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते.

Answer in Brief

Solution

  1. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाला इंग्रज 'शिपायांचे बंड' असे म्हणत असत. आपले लोकही 'शिपायांचा उठाव' असे म्हणतात.
  2. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवले आहे. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या नावाचे पुस्तकच लिहून त्यांनी आपल्या इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे.
  3. या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजांविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढा लढला गेला नव्हता.
  4. हा लढा राजांनी लढलेला नव्हता; तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा दिलेला होता. या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी, सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते.
  5. आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्तिमेवरील इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते.
  6. ब्रिटिशांच्या जुलमी, अन्यायी सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्याचा मुख्य हेतू होता.या लढ्यामुळेच जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला, त्यामुळे १८५७ चा लढा हे 'पहिले स्वातंत्र्ययुद्ध' होते हे स्वा. सावरकरांचे मत सार्थ ठरते.
shaalaa.com
सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - स्वाध्याय [Page 52]

APPEARS IN

Balbharati History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
स्वाध्याय | Q ५.२ | Page 52
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×