Advertisements
Advertisements
Question
तुमचे मत नोंदवा.
ई−प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली.
Solution
माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीत प्रशासनाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच जगभरातील अनेक देश मोठ्या प्रमाणावर ई-प्रशासनाकडे (ई-गव्हर्नन्सकडे) वळत आहेत.
गेल्या काही दशकांमध्ये प्रशासन गुंतागुंतीचे आणि वैविध्यपूर्ण होत चाललेे आहे. नागरिकांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षाही अनेक पटीने वाढल्या आहेत. माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामुळे कार्यक्षम पद्धतीने माहिती साठवणे, हवी असेल तेव्हा ती परत मिळवणे, जलदगतीने पाठवणे शक्य झाले आहे.
माहितीवर स्वहस्ते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवानपणे प्रक्रिया करता येणे सुलभ झाले आहे. यातून शासनाच्या कार्यपद्धतींना वेग येण्यास, निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्ण पद्धतीने होण्यास, पारदर्शकता वाढण्यास आणि उत्तरदायित्व लागू करण्यास मदत झाली आहे.
भारत सरकारच्या राष्ट्रीय ई-प्रशासन (नॅशनल इ-गव्हर्नन्स प्लॅन) योजनेचे उद्दिष्ट सार्वजनिक सुविधा नागरिकांच्या जवळ घेऊन जाणे हे आहे.
RELATED QUESTIONS
लोकपाल ही संकल्पना ______ या देशाकडून घेण्यात आली.
नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे -
योग्य संकल्पना सुचवा.
शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-
चूक की बरोबर सकार लिहा.
राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.
तुमचे मत नोंदवा.
ई-प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे.