Advertisements
Advertisements
Question
तुमच्या शाळेत 'अभिरूप न्यायालया'चे आयोजन करून विविध जनहितार्थ याचिकेचे प्रश्न तयार करा व अभिरूप न्यायालयात विचारा.
Solution
जनहितार्थ याचिकेचे प्रश्न:
-
शाळेच्या परिसरात स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येते. यासंदर्भात शाळा प्रशासनावर कोणती जबाबदारी आहे?
-
शाळेच्या आवारात प्लास्टिकचा वापर बंद करण्याची विनंती करणारी याचिका. शासनाने यासाठी कोणती कार्यवाही करावी?
-
विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक सवलत वेळेवर का मिळत नाही? यावर उपाय सुचवा.
-
शाळेजवळील रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग आणि सिग्नल नसल्यामुळे अपघाताचा धोका आहे. प्रशासनाला जबाबदार धरण्यास याचिका.
-
झाडे तोडली जात आहेत आणि हिरवळ नष्ट होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जनहित याचिका.
-
शाळेतील मुलींना स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध नाही. त्यासाठी शाळेला आदेश द्यावेत.
-
लहान मुलांवर वाढती मोबाईल आणि इंटरनेटची नशा – शाळा आणि पालकांनी यासाठी काय भूमिका घ्यावी?
-
पिण्याच्या पाण्याची अयोग्य व्यवस्था – विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न.