Advertisements
Advertisements
Question
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
'शब्दांचे सामर्थ्य अफाट असते' या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा.
Short Answer
Solution
संघर्ष कोणताही असो; दोन व्यक्तींमधला वादविवाद, हाणामारी असो किंवा अगदी दोन देशांमधली लढाई किंवा महायुद्ध असो; अखेर तो मिटवताना शब्दांचाच आधार घ्यावा लागतो. अशीच एक घटना माझ्या आयुष्यात घडली. माझा सर्वात जवळचा मित्र मला वाईट मार्गाला जाण्यापासून आडवत होता. परंतु मी त्याचं न ऐकता त्यालाच उलटसुलट बोललो. माझं बोलणं ऐकून तो खुप दुखावला. त्यांनतर तो माझ्याशी बोलत नव्हता. मला माझी चुक कळली. मी लगेच त्याची माफी मागितली. त्यांनतर मला शब्दाचं सामर्थ्य समजलं. शब्द नेहमी जपून वापरावे हेही समजले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?