Advertisements
Advertisements
Question
तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
मराठी भाषा विविध साहित्यप्रकारांनी नटलेली आहे. सर्व साहित्यप्रकारांतील ‘कविता’ हा साहित्यप्रकार माझ्या विशेष आवडीचा आहे. आकाराने लहान असूनही मोठा विचार व्यक्त करण्याचा, मोजकेच; पण योग्य शब्द वापरून अर्थ सांगण्याचा तिचा गुण मला आवडतो. दर वेळी जेव्हा मी कविता वाचतो तेव्हा नवे काहीतरी सापडल्याचा आनंद होतो. त्यात वापरलेले अलंकार, नाद निर्माण करणारे शब्द हे कवितेला साैंदर्य प्राप्त करून देतात. विविध कल्पना, भावना, विचार यांचे आविष्कार कवितांमधून चटकन वाचकांपर्यंत पोहोचतात. काही कवितांना चाल लावून त्यांचे गाण्यांमध्येही रूपांतर झालेले दिसते. मनातील भावना नेमकेपणाने व्यक्त करण्याचा गुण कवितेला इतर साहित्यप्रकारांहून वेगळा ठरवतो. त्यामुळे, मला कविता हा काव्यप्रकार फार आवडतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
'रंग साहित्याचे' या पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
फरक स्पष्ट करा.
चरित्र | आत्मचरित्र |
पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे लिहा.
‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
तुम्हांला आवडलेल्या पुस्तकाबाबत खालील मुद्द्यांचा विचार करून माहिती लिहा.
(१) पुस्तकाचे नाव
(२) लेखक
(३) साहित्यप्रकार
(४) वर्ण्यविषय
(५) मध्यवर्ती कल्पना
(६) पुस्तकातून मिळणारा संदेश
(७) मूल्य
(८) सामाजिक महत्त्व
(९) आवडण्याची कारणे
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कोण ते लिहा. (2)
- इसापनीती, पंचतंत्र, अकबर-बिरबल अशा गोष्टी ऐकवणारी - ______
- “आपण ‘साहस कथा’ शिकूया” म्हणणारी - ______
सुश्रुत: | तुम्ही सगळे कोण आहात? |
कथा: | अरे, असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे, मी आहे कथा. गोष्ट हे माझंच दुसरं नाव. |
सुश्रुत: | आपली ओळख कशी काय? |
कथा: | आईच्या, आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर-बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हांला मला वाचायची सवय लागते ना! |
सुश्रुत: | होऽऽ आता आठवलं आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा-कासव यांच्या गोष्टी सांगायची. |
कथा: | बरं का सुश्रुत! आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये. |
सुश्रुत: | तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या, ‘‘आपण ‘साहस कथा’ शिकूया.’’ |
कथा: | अगदी बरोबर! परीकथा, बोधकथा, विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललितकलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते किंबहुना उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. |
सुश्रुत: | तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना- |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. स्वमत (3)
तुम्हाला आवडलेल्या ललितकलेबद्दल तुमचे मत सांगा.