Advertisements
Advertisements
Question
तुम्हांला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? सोदाहरण सांगा.
Solution
पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल, तर यापुढे तो अर्थ मी शब्दकोशामध्ये शोधेन. शब्दकोशामध्ये लिपीतील वर्णांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी केलेली असते. शब्दांचे पहिले अक्षर किंवा वर्ण विचारात घेऊन ही रचना केलेली असते. त्यामुळे, पाठातील ज्या शब्दाचा अर्थ मला शोधायचा आहे, त्या शब्दाचे पहिले अक्षर लक्षात घेऊन त्यानुसार शब्दाचा शोध घेईन. उदा. पाठातील 'शब्द' हा शब्द शब्दकोशात शोधायचा असेल, तर सर्वप्रथम पहिले अक्षर म्हणजेच 'श' वर्णमालेत कोणत्या स्थानी आहे याचा शोध घ्यावा लागेल. 'श' या वर्णाने सुरू होणाऱ्या शब्दांची यादी समोर आल्यावर त्यामध्ये 'श' नंतर येणारे 'ब' हे अर्धे व्यंजन आणि 'द' हे पूर्ण व्यंजन शोधावे लागेल. अशा रीतीने, आपल्याला 'शब्द' हा शब्द शब्दकोशामध्ये शोधता येईल.