Advertisements
Advertisements
Question
तुम्ही कोण होणार, ते ठरवा. त्यासंबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यांवर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा.
Solution
मी मोठी झाल्यावर एक शिक्षिका होणार. शिक्षिका होवून मला खेड्यापाड्यातील तसेच अतिदुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समोर न्यायचे आहे. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे कुटुंबीय माझ्या सोबत आहेत. माझे वडील देखील एक आदर्श शिक्षक आहेत, त्यामुळे माझ्या या मतांना त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे.
माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप खूप अभ्यास करणार. विविध पुस्तकांचे वाचन करणार. विशेष म्हणजे शाहू महाराज, साने गुरुजी यांची पुस्तके वाचून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार. या पुर्वी मी बनगरवाडी पुस्तक वाचले. ज्याद्वारे मला एक नवी दिशा मिळाली.
शिक्षिका होवून मला खेड्यापाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांची जोपासना करून त्याआधारे त्यांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. त्यांच्यात माणुसकीच्या गुणांची रूजवणूक करायची आहे. एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून त्यांना जगता आले पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे.