English

त्या भेटीनंतर कधीही चेन्नईला जाण्याचा योग आला, की मी अण्णा युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांची गाठ घेत असे. ते तेथे अध्यापन करत असत. योग्य जोड्या लावा. ‘अ’ गट (i) चंदीपूर (ii) अण्वस्त्र चाचण्या -

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) चंदीपूर चेन्नई
(ii) अण्वस्त्र चाचण्या शिक्षणाची सोय
(iii) अण्णा युनिव्हर्सिटी ओरिसा
(iv) खेड्यापाड्यात जावेद मियाँदाद
(v) लहान पोरगा डॉ. कलाम

 

       त्या भेटीनंतर कधीही चेन्नईला जाण्याचा योग आला, की मी अण्णा युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांची गाठ घेत असे. ते तेथे अध्यापन करत असत. आम्ही तेव्हा अनेक विषयांवर बोलत असू; परंतु आमच्या बोलण्याचा मुख्य विषय म्हणजे- खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची सुविधा कशी पोहोचवायची, हाच असे. श्री. कलाम यांना आपल्या स्वतःच्या शिक्षकांविषयी नितांत आदर आहे, त्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी कमालीची कृतज्ञता आहे.

       मी एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले असताना चंदीपूरमध्ये जावेद मियाँदाद नावाच्या एखादा लहानशा कोळ्याच्या पोराकडून आयुष्यातील फार मोठं चिरंतन सत्य शिकले होते. जावेदने मला सांगितले होतं- ‘गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जाणं केव्हाही उत्तम.’ या अनुभवाविषयी मी कलाम यांना सांगत होते. कलाम यांनी त्याचे हे उद्गार ताबडतोब एका चिट्ठीवर लिहून घेतले आणि म्हणाले, “केवढा मोठा विचार हा!” ओरिसा हे त्यांचं अत्यंत आवडतं राज्य असल्याचं त्यांनीच मला सांगितलं, अण्वस्त्र चाचण्यांसाठी आयुष्यातील वीस वर्षे ते ओरिसातच राहिले होते.

       “तुम्ही जर ओरिसामध्ये कोणताही समाजकार्याचा उपक्रम हाती घेतलात, तर त्यासाठी मी जरूर येईन,” ते म्हणाले. तुम्ही तिथे बरचं काम करता आणि ओरिसा या राज्याविषयी तुम्हांलासुद्धा पुष्कळ आपुलकी आहे. याची मला कल्पना आहे.

२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)

  1. ओरिसा, हे यांचे आवडते राज्य होते - ______
  2. लेखिकेला ओरिसा राज्याविषयी वाटणारी - ______
Answer in Brief

Solution

१. 

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) चंदीपूर ओरिसा
(ii) अण्वस्त्र चाचण्या डॉ. कलाम
(iii) अण्णा युनिव्हर्सिटी चेन्नई
(iv) खेड्यापाड्यात शिक्षणाची सोय
(v) लहान पोरगा जावेद मियाँदाद

२. 

  1. ओरिसा, हे यांचे आवडते राज्य होते - डॉ. कलाम
  2. लेखिकेला ओरिसा राज्याविषयी वाटणारी - आपुलकी
shaalaa.com
अपठित गद्यांश
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×