English

उतारा वाचून दिलेली कृती करा. खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा. वृक्ष बहरू लागले आहेत. ____________ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

(अ) उतारा वाचून दिलेली कृती करा. 

(१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.
(अ) वृक्ष बहरू लागले आहेत. ______
(आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. ______

(२) स्पष्ट करा.
(अ) पाणी समजूतदार वाटते ______
(आ) पाणी क्रूर वाटते ______

 वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार? 

- राजा मंगळवेढेकर

(आ) खालील आकृत्या पूर्ण करा.

(१)
(२)

(इ) तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांतील अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.

वाक्य अव्यय अव्ययाचा प्रकार
(१) पाणी कुठे गच्चीवर लोळते. ______, ______ ______, ______
(२) पाणी येते आणि जाते. ______ ______
  • उताऱ्यातून कळलेला ‘पाण्याचा स्वभाव’ तुमच्या शब्दांत लिहा.
  • वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.
Answer in Brief

Solution

(अ) (१)  
(अ) वृक्ष बहरू लागले आहेत - वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. 
(आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे - करंगळीची सोंड झाली आहे.  

(अ) (२)
(अ) पाणी समजूतदार वाटते, पाणी शांतपणे वाहते, तेव्हा ते जणू काही कोणतेही नुकसान होऊ नये, याची काळजीच घेत असावे असा भास होतो. म्हणून ते त्या वेळी समजूतदार वाटते.
(आ) पाणी क्रूर वाटते, नदीकाठावरच्या गरिबांच्या झोपडया उद्धवस्त करणाऱ्या पुराच्या पाण्याला पाहिल्यावर त्याच्या मनात त्या गरीब, दुबळ्या माणसांबद्दल कणवच नसावी, अशी भावना मनात जागी होते आणि ते पाणी स्वभावाने क्रूर असावे, असे वाटू लागते.

(आ)

(१)

वर्षाऋतूतील निसर्गाचे रूप :

  • आकाश ढगांनी पूर्णपणे झाकून गेलेले असते.
  • संपूर्ण अवकाश पाणावलेला असतो.
  • अधूनमधून पाऊस कोसळत असतो.
  • सगळीकडे हिरवीगार वनराजी पसरलेली असते.
  • नदी नाल्यांतून पाणी ओसंडून वाहत असते.
  • नवे पाणी उसळत, घुसळत व फेसाळत वाहते.
(२)

पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया :

  • उसळत, घुसळत, फेसाळत धावणे.
  • काठ ओलांडून ओसंडून वाहणे.
  • संथपणे, धीरगंभीरपणे वाहणे.
  • बेफाम होऊन सगळे बुडवत धावणे.

 (इ)

वाक्य अव्यय अव्ययाचा प्रकार
(१) पाणी कुठे गच्चीवर लोळते. कुठे, वर क्रियाविशेषण व, शब्दयोगी अव्यये
(२) पाणी येते आणि जाते. आणि उभयान्वयी अव्यय
  • पावसाळ्यात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य असते. जिकडे तिकडे पाणीच पाणी असते. अधूनमधून पाऊस कोसळत असतो. त्यामुळे नदीनाल्यांतून पाणी ओसंडून वाहत असते. वाहताना ते कधी काठाला धडकते, तर कधी काठावर चढते. यावरून पाण्याचा धसमुसळेपणा जाणवतो. काही काही ठिकाणी ते इतके संथपणे वाहते कि वाटावे जणू काही ते आपला दरारा दाखवत आहे. मोठ्या पुलांखालून पाणी वाहत जाते, तेव्हा ते समजूतदार, शहाण्या मुलासारखे वाटते. कधी कधी ते काठावरच्या गरिबांच्या झोपडया उध्वस्त करते. अशा वेळी ते स्वभावाने खूप क्रूर असावे, असे मनात येते. कधी कधी ते झाडावर चढते, गच्चीवर लोळते, घाटाला बुडवते, वाटेला तुडवत. अशा वेळी त्याच्या स्वभावातला अवखळपणा जाणवत राहतो. असे पाण्याच्या स्वभावाचे अनेक पैलू या उताऱ्यातून जाणवत राहतात.

  • आपल्याकडे अनेक ठिकाणी धो-धो पाऊस कोसळतो. पावसाचे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. पावसाचे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवण्याचे व साठवून ठेवण्याचे काही उपाय आहेत. ते आपण अमलात आणले पाहिजेत. खूप महत्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे जमिनीच्या उतारावर आडवे चार खोदणे. त्या चरांमध्येच वाढणारी झाडे लावावीत. पाणी थबकत थबकत वाहत राहिल्यामुळे ते जमिनीत भरपूर मूरते. पाझर तलाव खोदल्यावरसुद्धा पाणी जमिनीत भरपूर मुरते. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे झाडे लावल्यास झाडांची मुले जमिनीत पाणी धरून ठेवतात. अशा उपायांनी जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. विहिरींमध्ये वर्षभर पाणी राहते. पाणी साठवण्यासाठी जमिनीत खड्डेसुद्धा खोदतात. या खड्ड्यांतील पाणी जमिनीत मुरून जाऊ नये म्हणून उपाययोजना करतात. त्यामुळे पावसाळ्यानंतर जवळपासच्या झाडझाडोऱ्याला व गुरांना पाणी देता येते. अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय योजून पाण्याची गरज भागवत येते.
shaalaa.com
अपठित गद्यांश
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: गोष्ट अरुणिमाची - अपठित गद्य आकलन [Page 44]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 11 गोष्ट अरुणिमाची
अपठित गद्य आकलन | Q 1 | Page 44

RELATED QUESTIONS

उतारा वाचून दिलेल्या कृती करा.

(अ) तक्ता पूर्ण करा.

जंगलाचा स्वभाव  माणसाचा स्वभाव
(१) ______ (१) ______
(२) ______ (२) ______

 

जंगलाने सर्वांचे स्वागत केले-दिलखुलास, मनमोकळे. जंगलाचा स्वभावच असा मोकळाढाकळा असतो. अढी धरावी, तेढ बाळगावी यासाठीसुद्धा एखादा कोपरा लागतो. जंगलाला असा कोपरा नसतो. माणसं आणि त्यांची घरं यांना कोपरे असतात म्हणून ती जंगलाइतकी मुक्त, मोकळी नसतात. जंगल मनमोकळे असते. सहजसुंदर असते. ऊनपावसाशी ते लपंडाव खेळते. थंडीवाऱ्याशी गप्पा मारते. फुलताना, खेळताना, डुलताना, हसताना ते मनापासून सगळे काही करते. एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस, भामरागडच्या जंगलाची वेश बदलण्याची वेळ, तर त्या जंगलाने अंगाखांद्यावरची पर्णभूषणे ढाळलेली दिसली. त्यातही संकोच नाही, की संशय नाही. त्यामुळे जमीन दिसू नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुदूर सडा. राखाडी, पिंगट रंगाचा. वारा हलकेच त्यात शिरायचा तेव्हा सळसळ आवाज व्हायचा. नागमोडी पाऊलवाटेने जेव्हा पावले त्यावर पडायची तेव्हा त्यातून चर्रचर्र आवाज उठायचा. जणू जंगल बोलते आहे असे वाटते. जंगल कुजबुजते आहे असे भासते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो तेव्हा तो गाणे होऊनच घुमत घुमत बाहेर पडतो. पानं, फांद्या, फुलं सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते. पावसाच्या सरी झेलते. सचैल न्हाते. भिजत चिंब होऊन जाते.

-राजा मंगळवेढेकर.

(आ) चौकटी पूर्ण करा.

(इ) खालील कृती करा.

(१) खालील शब्दांची जात ओळखा.

(i)  
(ii) 

(२) सूचनेप्रमाणे सोडवा.
(i) जंगल मनमोकळे असते. (काळ ओळखा.)
(ii) सहसंबंध लिहा. - कोपरे : `square` पाने : पान

  • स्वमत.
    जंगलाचा मनमोकळा स्वभाव सोदाहरण स्पष्ट करा.

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)

आकलन कृती

१. उत्तर लिहा. (०२)

  1. ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
  2. फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो?

पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते.

नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य!

या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात.

२. आकलन कृती 

  १. पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (०२)


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)

आकलन कृती

१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

  1. परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
  2. झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.

चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत.

ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.

२. आकलन कृती 

  १. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२)

  1. पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______
  2. हृदयाला आनंद बहाल करणारा ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)

आकलन कृती

१. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 

  i. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात. (०१)

   अ) कारण ते आधी दुसऱ्याचा विचार करतात नंतर स्वत:चा विचार करतात.

    ब) कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात.

    क) त्यांच्या दृष्टीने नातं ही एका अंतरावरली गोष्ट असते.

    ड) त्यांच्या दृष्टीने नातं अवकाश देणारे असावे.

 ii. आपल्या दृष्टीने नातं ही एक ______ (०१)

     अ) गुंतलेली गोष्ट असते.

     ब) विखुरलेली गोष्ट असते.

     क) अंतरावरील गोष्ट असते.

     ड) आपल्यासाठी सोईची गोष्ट असते.

दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बऱ्याचदा आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो.

२. आकलन कृती 

  १. वैशिष्ट्ये लिहा. (०२)

   खऱ्या नात्यामधील संवेदना

  1. ______
  2. ______
  3. ______
  4. ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)

आकलन कृती

१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

  1. परिच्छेदामध्ये कोणत्या महिन्याचा उल्लेख आला आहे?
  2. झाड कोणत्या रंगांनी भरून टाकलं आहे?

चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत.

ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.

२. आकलन कृती 

 १. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२)

  1. पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______
  2. हृदयाला आनंद बहाल करणारा ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) उत्तर लिहा.  (२)

  1. ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
  2. फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो?

पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते.

नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य!

या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात.

२) पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (२)

  ←नव्या पिढीला माणूसपणाच्या सुंदरतेकडे नेणारे→  

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कारण आहे? संकटे ही काही कायमची नसतात ना? मग त्यांच्याकडे सोशिकपणे, खिलाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी का असू नये? संकटांचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते, तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात; परंतु ती ओसरल्यावर, आपण त्यांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही. आपण घाबरतो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचणींचे खरेखुरे स्वरूप आपणांस कळलेले नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा-विनोद करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.

(2) कधी ते लिहा: (2)

  1. आपण संकटांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही.
  2. आजारी, संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.

उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

१. आकृती पूर्ण करा. (२)

आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, राहण्यासाठी झोपड्या बांधणे. अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले. अर्थात्‌ ही प्रक्रिया सोपी नव्हती अनेक अडचणी होत्या. पण त्यावर मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले, त्यांना निवास उपलब्ध करून दिला. शिवाय त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर हास्य उमलले. हे हास्य समाधानाचे, आत्मविश्वासाचे होते.

बोटं झडलेल्या थिट्या हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा. लाभावा यासाठी ‘आनंदवनाची’ धडपड असते.

आनंदवन उभारताना बाबांनी आतोनात कष्ट घेतल त्यामुळेच गेली सहा दशके तिथे महारोगाने, अंधत्वाने, अपंगत्वाने झाकोळून गेलेली जीवने उजळून निघाली. जन्माला येतानाच उपेक्षा घेऊन आलेल्या जीवांमध्ये ‘सुंदर मी होणार’ यासोबत ‘सुंदर मी करणार’ हा मंत्र आनंदवनने जोपासला.

२. योग्य जोड्या लावा: (२)

‘अ’ गट ‘ब’ गट
(i) भंगलेली (i) भाकर
(ii) खचलेली (ii) जीवने
(iii) कष्टाने मिळवलेली (iii) मने
(iv) झाकोळलेली (iv) शरीरे

३. व्याकरण:

(i) खालील वाक्यांतील विशेषणे शोधून लिहा: (१)

(अ) त्यांना ताठ मनाने जगण्याची प्रेरणा मिळाली.

(ब) त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.

(ii) खालील सर्वनामांचा वाक्यात उपयोग करा: (१)

(अ) तू

(ब) तुझा

४. स्वमत: (२)

‘सुंदर मी करणार’ या आनंदवनाने जोपासलेल्या मंत्राचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृती पूर्ण करा. (2)

           सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशाजवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होते. जगात वावरताना सौजन्यशील वृत्ती अंगी बाणलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात; पण त्याहीपेक्षा आपण माणुस आहोत, पशू नाही याची जी जाणीव होते तीच महत्त्वाची असते. ज्याची वृत्तीच आक्रमक असते आणि ज्यांचा स्वभाव जुळवून घेण्याचा नसतो, त्यांची वृत्ती ही स्वभावत: पशूची असते. त्यामुळे, त्यांच्याजवळ सौजन्य असेल कसे? सौजन्य ही मानसिक वृत्ती आहे. मनातून ती साकारते व कृतीतून प्रकट होते. व्यवहारात अशा वृत्तीतून जे वागणे होते किंवा आचार घडतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते.

2. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. सुजनांकडून अपेक्षित असलेले - ______
  2. सौजन्यातून व्यक्त होणारे - ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) हिरा विद्वान
(ii) शिल्पकार श्रोतृगण
(iii) विषयतज्ज्ञ खाण
(iv) भाषण प्रबुद्ध
(v) प्रौढ शिल्पकला

 

           मनुष्याच्या अंगी कोणताही गुण असला तरी परिश्रमाखेरीज व अभ्यासाखेरीज त्याचे तेज कधीही पडावयाचे नाही. खाणीतून नुकताच खणून काढलेला हिरा जसा मुळात तेजस्वी नसून शिल्पकारांच्या संस्कार प्रयोगांची त्याला खास अपेक्षा असते त्याचप्रमाणे गुणीजनांच्या अंगी असणारी कलाही शिक्षणाखेरीज पूर्वत्वाने कधी प्रकट होत नसते. असो, तर वक्‍तृत्व हे जरी मनुष्याच्या अंगी जन्मसिद्धच असले पाहिजे, तरी ते तसे कोणाचे ठायी असतानाही विद्वत्तेखेरीज ते पूर्ण शोभा कधीही द्यावयाचे नाही. विद्वान व रसिक लोकांना तुष्ट करून त्यांची मते आपल्या भाषणाने ज्यास वळवावयाची असतील त्याने भाषाशुद्धता, अर्थसंगती, सुंदर व प्रौढ विचार मोठमोठया नामांकित काव्यांचे, नाटकांचे व इतिहासाचेही ज्ञान संपादन करून त्याच्याशी त्याने सतत परिचय केला पाहिजे. याखेरीज इतर अनेक विषयांची माहिती त्याला असली तर चांगलीच कारण दृष्टान्त वगैरे देण्यास व भाषणास वैचित्रय व मनोरंजकता आणण्यास ती फार उपयोगी पडते. आणखी एक प्रभावी साधन म्हणजे अनुकरण. कोणताही गुण साध्य करून घेण्यास अनुकरणासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही.

२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)

  1. गु्णीजनांच्या अंगी असणारी कलेला अपेक्षा असते - ______
  2. खाणीतून निघणारे - ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

             माणूस, त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे, हा कर्मवीरांचा आग्रह होता. भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे. खेडी ही निसर्गाला अधिक जवळची आहेत. व्यक्तिचे पौरुष, प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून.

             कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळविला. संस्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा, वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला. पुढे-पुढे शाळांच्या वास्तू उभ्या राहिल्या. शक्य असेल तेथे शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली. शेतात विहिरी खोदण्यात आल्या. हे सर्व विदयार्थ्यांच्या श्रमदानातून घडवून आणले.

             अंगमेहनतच गरिबांची दौलत. ‘कमवा आणि शिका’ या शिक्षण-क्षेत्रातील मंत्राचे द्रष्टे कर्मवीर हेच होते.

(2) चौकटी पूर्ण करा. (2)

  1. कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत - ______
  2. कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र - ______

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे - (२)

(य) ______

(र) ______

           मी वेड्यासारखी समुद्र पाहत राहायची. कधी सकाळी तर कधी चांदण्यारात्री, पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा. कसं थंड, शांत वाटायचं. मनातले सगळे विकल्प लयाला गेले असायचे. अवघं अस्तित्व निरामय होऊन जायचं. आपण आणि हा अथांग पसरलेला समुद्र! बाकीची जाग-जाण मिटलेली असायची. अशी अभूतपूर्व शांतता मी पूर्वी कधी अनुभवलेली नव्हती. मुरुडच्या समुद्रानं मला बांधून ठेवलं. मी लिहायला लागले त्यामागे या मुरुडच्या समुद्राची फार मोठी प्रेरणा आहे. पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे महत्त्वाकांक्षा, यश आणि आत्मविश्वासाचं प्रतीक वाटायच्या, तर मागे मागे सरकणाऱ्या लाटा म्हणजे पराभव, अपयश, मानहानी पचवणारी शक्ती. समुद्राच्या पोटात किती काय काय दडलं असेल! त्यानं किती पचवलं असेल, किती सहन केलं असेल. माणसाच्या मनाचं मला ते दुसरं रूप वाटायचं, समुद्राशी माझा संवाद चालायचा.

- गिरिजा किर

(२) ‘पाण्यावर सांडलेलं चांदण पाहिलं’ की लेखिकेची होणारी भावावस्था - (२)

(य) ______

(र) ______


खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

         अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला.

माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उताऱ्याच्या आधारे व तुमच्या मते स्पष्ट करा.


कमी वेळात, कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता? त्यांची यादी करा.


ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले विविध ॲप्स कोणते? त्यांचा वापर कसा करावा याविषयीची माहिती मिळवा.


खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

प्रचंड बुंधा असलेल्या मोहाच्या झाडाला पोखरी असतात. रिमझिम पावसात अडई व वणकी ही रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात. मोहरानातून तळ्याकडं उडत जाणाऱ्या येणाऱ्या रानबदकांचं दृश्य मोठं गूढ रम्य वाटतं.

माझं वनविभागात जाणं केवळ अपघात नव्हे. ते माझं भाग्य आहे, वनांच्या सावलीत मी वाढलोय. ग्रंथात आढळून येणार नाही असं ज्ञान मी जंगलातून प्राप्त केलंय. गुरुजनांकडून शिकता येणार नाही ते वृक्ष व दगडांनी पढविलयं. वृक्षांइतका धर्मात्मा कुणी नाही. त्यांच्यापासून मी देवाचं अस्तित्व जाणलयं. झाडं जशी सूर्यप्रकाश व दव शोषून घेतात तसं चांगलं तेवढं घेतलय. पानं गळतात. फुलं कोमेजतात. पण ती पुन्हा विकसित होतात. मितव्ययी म्हणजे काय ते जंगलापासून शिकावं. आभाळाच्या, पर्वताच्या, हिरव्या मैदानाच्या चमकणाऱ्या पाण्याच्या केवळ दर्शनानं कितीतरी स्मृती माझ्यात जागृत होतात. तुम्हाला वाटतं ना आपली. मुलं विचारी बनावीत, त्यांनी भावनांतील पावित्रय जाणाव, तर त्यांना जंगलात व पर्वतावर न्या.

(१) चौकटी पूर्ण करा -     (२)

रिमझिम पावसात अडई व वणकी या रानबदकांकडून होणाऱ्या कृती -

(य) ______

(र) ______

(२) कारणे लिहा -     (२)

आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे, कारण -

(य) ______

(र) ______


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रदधा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत.
  1. आकृतिबंध पूर्ण करा:           (2)
  2. टीप लिहा:         (2)
    स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम 

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×