English

उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७) आकलन कृती 1. लेखकाने बिबळयाची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा. १. जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. लेखकाने बिबळयाची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.

१. जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली

२.

३.

४. तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळया बसला होता

५.

६.

७. वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला

ता.२७ मे १९९७, वेळ-सकाळी ६ ते ९.३०, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.

आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो.

गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं, तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळयाची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं; पण मला तरी काही दिसलं नाही.

अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळयांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळयांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता; पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती, तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडं होती, त्यामुळे त्यानं अद्याप आम्हांला पाहिलं नव्हतं, पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि 'कट्' असा आवाज झाला.. तिखट कानांच्या बिबळयानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला.

२.

१. चौकट पूर्ण करा. (०१)

  1. प्रकल्पाचे नाव- ______
  2. विश्रामगृहाचे नाव - ______

२. कारण द्या. (०१)

चालताना वनमजूर अचानक थबकला; कारण ...

3. स्वमत (०३)

भारतातील तुमच्या आवडीच्या अभयारण्यासंबंधित तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करा.

Long Answer

Solution

1.

१. जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली

२. लेखकाने सगळयांना हातानंच थांबायची खूण केली

३. लेखकाने दुर्बीण डोळयांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली

४. तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळया बसला होता

५. त्याचा रंग आसपासच्या परिसराशी मिसळून गेला होता, शेपूट हलल्यामुळे तो लेखकांस दिसला

६. त्याची पाठ लेखक व साथीदारांकडे असल्यामुळे बिबळयाने त्यांना पाहिलं नव्हतं

७. वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला

2.

१.

  1. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर
  2. कोळसावन

२. रस्त्यात एका मोठ्या बिबळयाची ताजी पावलं उमटली होती.

3. भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले ताडोबा अभयारण्य माझ्या विशेष आवडीचे आहे. विविध प्रकारची वृक्षराजी कोरडे पानगळ वन, सपाट मैदानी भूप्रदेश, खोल दरी, तलाव आणि विविध प्रकारची प्राणिसंपदा अशी विविधता येथे आढळून येते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे अभयारण्य पट्टेरी वाघांसाठी राखीव क्षेत्र आहे. हेच या अभयारण्याचे आकर्षण आहे. या वाघाबरोबरच बिबट्या, अस्वल, उदमांजर, रानमांजर, रानकुत्रे, वन्यबैल, गवा, ढोल, तरस, लाडंगा, कोल्हा, हरिण, सांबर, चितळ, भेकर, नीलगाय, अजगर, कोब्र, घोरपड अशा प्राणिसंपदेने हे अभयारण्य समृद्ध आहे. याशिवाय, येथे आढळणारे विविध जातीचे पक्षी व फुलपाखरे ही देखील प्रेक्षकांना येथे आकर्षित करतात. येथे प्रशिक्षित मार्गदर्शकासह जीपमधून केलेली जंगल सफारी म्हणजे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता. येथील निसर्गाची किमया पाहताना डोळयांचे पारणे फिटते.

shaalaa.com
जंगल डायरी
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: जंगल डायरी - कृती क्रमांक:१

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi (Second Language) 10 Standard SSC
Chapter 11 जंगल डायरी
कृती क्रमांक:१ | Q १. अ.

RELATED QUESTIONS

लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.

(१) जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.

(२) __________________

(३) __________________

(४) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.

(५) __________________

(६) __________________

(७) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला.


कारणे लिहा.

वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण __________


कारणे लिहा.

 वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती, कारण _________


वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.


'लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली', हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, याविषयी तुमचे मत लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. कोण ते लिहा. (2)

  1. आवाज काढून पिल्लांना मार्ग दाखवणारी - ______
  2. घसरून पाण्यांत धपकन पडणारे - ______

           वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळं तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला.

           साधारणत: कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच ‘ऑऽ वऽ’ असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वत:चं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती-कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती.

२. कृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

उताऱ्याच्या आधारे वाघिणीने घेतलेली पिल्लांची काळजी याबाबत तुम्हाला दिसून आलेले मुद्दे सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×