English

उत्तरे लिहा. सभासंमेलने गाजवणारे कवी - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

उत्तरे लिहा.

सभासंमेलने गाजवणारे कवी - ______

One Word/Term Answer

Solution

सभासंमेलने गाजवणारे कवी - कविवर्य नारायण सुर्वे

shaalaa.com
शाल
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: शाल - कृती [Page 8]

APPEARS IN

Balbharati Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 3 शाल
कृती | Q (१)(ई) | Page 8

RELATED QUESTIONS

उत्तरे लिहा.

२००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - ______

खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.

एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.

कारणे शोधून लिहा.

एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण ___

कारणे शोधून लिहा.

शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण ___

आकृती पूर्ण करा.

खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.

खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते!

खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.

हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या.

लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) चौकटी पूर्ण करा: (2)

  1. उताऱ्यात आलेले नदीचे नाव -

  2. बाळाची आई करत असलेला उद्योग -

        पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.

        कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’

(2) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

(3) स्वमतः (3)

‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

१. वैशिष्ट्ये लिहा: (२)

  1. कृष्णा नदीचा प्रवाह → ______
  2. टोपलीत ठेवलेले मूल → ______
  3. लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल → ______
  4. कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम → ______

पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. 

कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’

२. प्रत्येकी एका वाक्यांत उत्तरे लिहा: (२)

  1. सन्मानाची प्रतीके लिहा.
  2. पाचपन्‍नास रुपयांच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला का दिल्या असाव्यात?

३. व्याकरण: 

(i) गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा: (१)

(अ) ठेवणे, गुंडाळणे, शहाणे, गाजणे → ______

(ब) शाल, कृष्णा, पर्वत, नदी → ______

(ii) अनेकवचन लिहा: (१)

(अ) टोपली - ______

(ब) मासा - ______

४. स्वमत: (२)

लेखक - रा. ग. जाधव यांची संवेदनशीलता जाणवणारे कोणतेही एक 'उदाहरण पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×