Advertisements
Advertisements
Question
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
Solution
ही कारणे लिहिण्यापूर्वी त्या वेळची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्या काळात घरातली सर्व कामे स्त्रियांनीच करायची, असा नियम होता. पुरुष या कामांना हात लावत नसे. पुरुषाच्या पेन, पाकीट, रुमाल या साध्या वस्तूसुद्धा स्त्रीनेच नीट ठेवायच्या आणि पुरुषांना हव्या त्या वेळी त्यांच्या हाती दयायचा. पाहणे सुद्धा केव्हाही येत. घरातल्या स्त्रीने आलेल्या पाहुण्यांची सर्व सरबराई करावी, त्या वेळी स्वतःची सोय व गैरसोय पाहू नये, असा रिवाज होता. घरातील स्त्री कोणत्या तरी कामासाठी बाहेर पडत असतानाच पाहुणे आले तर बाहेर जाणे रद्द केले पाहिजे, असे सगळेजण मानत होते. अशा वेळी त्या स्त्रीचे कितीही नुकसान झाले, तिला अडीअडचणी आल्या, ती काही सुखाला मुकली तरी तिने पाहुण्यांची सरबराई केली पाहिजे, असा दंडक होता.
या पार्श्वभूमीवर निशावहिनींचा सल्ला पाहिला पाहिजे. निशावहिनी सांगतात की, प्रत्येक माणूस स्वार्थी असतो. मग फक्त स्त्रीनेच का म्हणून इतरांच्या सुखासाठी झटत राहावे? स्त्रीने स्वतःच स्वतःचे सुख पाहिले पाहिजे. स्वतःच्या गरजा पाहिल्या पाहिजेत. नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी जशी पत्नी सांभाळते, तशा पत्नीच्या गोष्टी पतीने का सांभाळू नयेत? एखादया दिवशी पतीने स्वयंपाक करावा. पत्नीचे जेवणाचे ताट मांडावे. एखादया दिवशी पतीने पत्नीच्या साडीला इस्त्री करावी. अचानक न सांगता पाहुणे घरी आले, तर आपली कामे बाजूला ठेवू नयेत. स्वतःची गैरसोय करून घेऊ नये. म्हणजे हळूहळू पाहुण्यांनासुद्धा न कळवता अचानक कोणाहीकडे जाऊ नये, याची सवय होईल. निशावहिनींचे विचार त्या काळाच्या मानाने खूपच बंडखोरीचे होते. अनेकांना ते पटत होते, पण स्वीकारणे जड जात होते. यामुळेच निशावहिनींचे विचार सुसाट वाटतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.
पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
तपशिलांचा महासागर :
______ हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
प्रायोगिक नाटक | व्यावसायिक नाटक |
फरक स्पष्ट करा.
नाटक | इतर साहित्यप्रकार |
खालील कृती करा.
खालील कृती करा.
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
घटना/कृत | परिणाम |
नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
घटना/कृत | परिणाम |
नाटकात संघर्ष असला तर |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटक अनेक कलांचा संगम
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
अभिव्यक्ती.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.
टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा
'युद्ध आणि शांती' ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.