English

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा: विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग -

Advertisements
Advertisements

Question

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग

Answer in Brief

Solution

विज्ञान शाप की वरदान?

आज प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला पाहायला मिळतो. विज्ञानाने आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी कार्यक्षमतेत वृद्धि झाली आहे. पूर्वीच्या काळात जे काम तासंतास केले जायचे विज्ञानाच्या प्रगतीमुळे कमी वेळात करणे शक्य झाले आहे. परंतु विज्ञान आणि जेवढ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तेवढेच याचे दुष्परिणाम देखील संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. अश्या परिस्थितीत हा प्रश्न समाजापुढे उभा आहे की विज्ञान मानव जीवनासाठी वरदान आहे की अभिशाप?

विज्ञानाला वरदानांच्या रूपाने पाहिले तर त्याने मानवी कल्याणासाठी अनेक साधने उपलब्ध करून दिली आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले सर्व कार्य विज्ञानानेच संचलित होतात. विजेचा शोध विज्ञानातील एक महत्त्वाचा शोध आहे. दैनंदिन जीवनात विजेचे अनेक उपयोग आहेत. कपडे धुणे त्यांना प्रेस करणे, अन्न शिजवणे, थंडीच्या दिवसात उष्ण पाणी देणे, उन्हाळ्यात शितल हवा देणे इत्यादी सर्व औद्योगिक प्रगती विज्ञानाने निर्माण केलेल्या विजेमुळे शक्य झाली आहे.

वाहतुकीच्या क्षेत्रात विज्ञानाने लावलेले शोध प्रशंसनीय आहे. आज रेल्वे, विमान, मोटार गाडी, बस, मोटरसायकल इत्यादी वाहतुकीच्या साधनांमुळे मनुष्य एका जागेहून दुसऱ्या जागी काही तासांतच पोहोचू शकतो. एवढेच नव्हे तर अंतराळ यानच्या मदतीने मनुष्य इतर ग्रहांवर देखिल पोहोचला आहे. माहिती संप्रेषण क्षेत्रात विज्ञानाची कामगिरी उल्लेखनीय आहे. विज्ञानामुळे आकाशवाणी, दूरदर्शन, मोबाईल इत्यादी संसाधनांचा उपयोग करून माहिती एका जागेवरून दुसऱ्या जागी काही क्षणातच पोहोचवली जाते. याशिवाय शेती, औद्योगिक, शिक्षा व मनोरंजनाच्या क्षेत्रातही विज्ञानाचे फार महत्त्व आहे.

असे म्हटले जाते की कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात, ज्याप्रमाणे विज्ञानाचे फायदे आहेत त्याच पद्धतीने याचे तोटे देखील आहेत. विज्ञानाने मनुष्याच्या हातात अत्याधिक शक्ती देऊन दिली आहे. याच्या उपयोगावर कोणतेही बंधन नाही. म्हणूनच आज जगभरात वाईट बुद्धीचे लोक विज्ञानाचे उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करीत आहेत. याचे नुकतेच उदाहरण द्वितीय विश्व युद्ध आहे. या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले. यामुळे मोठ्याप्रमाणात मनुष्य मारले गेले. याशिवाय विज्ञानाने उपलब्ध करून दिलेले अस्त्र शस्त्र वापरून आतंकवादी विचारसरणीच्या लोक जगभरात लोकांना मारत आहेत. विज्ञानाने तयार केलेले परमाणु संपूर्ण विश्वाला नष्ट करण्याची शक्ती ठेवतात.

विज्ञानाचे वास्तविक लक्ष मानवी हित व मानवी कल्याण आहे. म्हणून आज आवश्यकता आहे की अधिकाधिक लोकांना विज्ञानाचे सदुपयोग समजावून सांगितले जायला हवे. शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञान दिन तसेच इतर दिवशी सेमिनार, भाषणे व विविध कार्यक्रम आयोजित करून विज्ञानाचे योग्य उपयोग व महत्त्व सांगायला हवे.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×