Advertisements
Advertisements
Question
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
Solution
विश्वकोश हा सर्वविषयसंग्राहक असल्याने त्यात विविध विषयातील विविध शब्दांचा अर्थासहित समावेश असतो. मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी मी रोज विश्वकोशातील एक नवीन शब्द वाचण्याचा, तो समजून घेण्याचा प्रयत्न करेन. हा नवा शब्द मित्र-मैत्रिणींना सांगेन. शाळेतील फळ्यावर तो शब्द अर्थासहित लिहित जाईन. जेणेकरून दिवसभरात तो नवीन शब्द सर्वांच्या नजरेसमोर राहील व सर्वांच्या शब्दसंपत्तीत भर पडेल. बाराखडीतील स्वर आणि व्यंजन, अकारविल्हे यांचे ज्ञान पक्के करण्यासाठीही विश्वकोशाची मदत होईल. वाचनात आलेले कठीण शब्द विश्वकोश वापरून मी समजून घेईन.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा.
- ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
- एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण...'
- तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक (देशभक्त).
- ‘सुधारक’ चे संपादक.
- कवी यशवंत यांचे आडनाव.
- विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव.
- मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
- कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.
टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग -
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितिप्रक्रिया -
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.