Advertisements
Advertisements
Question
‘वृत्तलेखन करत असताना वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागते’ तुमचे मत लिहा.
Short Note
Solution
वृत्तलेखन करत असताना वाचकांची अभिरुची, त्यांची गरज लक्षात घेऊन वर्तमानपत्रात लेखन केले जाते. तसेच वर्तमानपत्र प्रकाशित करताना तो ज्या परिसरात, शहरात प्रसिद्ध वितरण करणार आहेत तेथील वाचकवर्ग, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन लेखन केले जाते. म्हणजेच ग्रामीण स्तरावरील वा शहरी भागातील वर्तमानपत्रात थोडाफार फरक असतो. त्या परिसरानुसार त्या वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होत असतात असे वृत्तपत्र वाचकांच्या मनावर वसा उमटविताना दिसतात. त्यामुळे वृत्तलेखकालाही वाचकांच्या अभिरुचीचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. त्यासाठी स्थानिक घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न अशाही गोष्टींचा विचार करून वृत्तलेखन केले जाते. अशा वृत्तलेखनातून वाचकांची अभिरुची आणि बौद्धिक भूकही भागवली जाते.
shaalaa.com
वृत्तलेख (फिचर रायटिंग)
Is there an error in this question or solution?