English

‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा: काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग -

Advertisements
Advertisements

Question

‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग

Answer in Brief

Solution

वर्तमानपत्रे बंद झाली तर!

रविवारचा दिवस होता. थोड्या उशिराच मी जागा झालो. नेहमीप्रमाणे वर्तमानपत्राचा अंक दारात पडलेला नाही. वाटले, रविवार असल्यामुळे वर्तमानपत्र टाकणाऱ्या पोऱ्याने उशीर केला असेल. थोडी वाट पाहिली व रेडिओ चालू केला. सकाळच्या बातम्या चालू होत्या. या बातम्यात असे जाहीर करण्यात आले, की कागदाच्या तीव्र टंचाईमुळे व छापखान्यातील कामगारांच्या वेतनवाढीमुळे आजपासून वर्तमानपत्रे बंद करण्यात आली आहेत.

क्षणभर मन अस्वस्थ झाले. वर्तमानपत्रे बंद झाली तर सर्वत्र काय गोंधळ माजेल याचे चित्र माझ्या डोळ्यांपुढे उभे राहिले. वर्तमानपत्रावरच ज्यांचे जीवन अवलंबून आहे त्या संपादक, लेखक, बातमीदार, कामगार, विक्रेते व वर्तमानपत्रे टाकणारी माणसे यांची बेकार कुटुंबे डोळ्यांसमोर तरळून गेली. या व्यवसायातील लोकांच्या हालाची कल्पनाच करवेना. या व्यक्ती सोडल्या तरी इतरांचे हाल काय कमी होणार आहेत का? चहाचे घुटके घेत घेत वर्तमानपत्रातील चुरचुरीत बातम्यावरून नजर फिरवण्याची सवय असलेल्या व्यक्तींना चहा अगदी बेचव वाटू लागेल. वाचनालयांची स्थिती काय होईल? वर्तमानपत्रेच तिथे नसतील तर तिकडे जाणार तरी कोण? कागदाचा व्यवसाय करणाऱ्यांचा धंदाच बसून जाईल.

दररोज होणाऱ्या अपघातांच्या वार्ता कशा कळणार? चोऱ्या, खून, मारामारी यांच्या चटकदार बातम्या वाचणारे व्यक्तींना अन्न गोड लागणार नाही. नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना नोकऱ्या कुठे आहेत हे कसे कळणार? रोज ‘कुठे काय?’ हे सदर पाहून सायंकाळच्या वेळी सभा, व्याख्याने प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणाऱ्यांनी आपला वेळ कुठे?

चित्रपट व नाटकांच्या आवडींना करमणुकीची विवंचना लागेल. राशिभविष्ये वाचून दिवस घालवणाऱ्या भविष्यवेड्या माणसांचे आता कसे व्हायचे? राजकारणात रस घेणाऱ्यांना जगाची हालहवाल कळणार तरी कशी? व्यापाऱ्यांना बाजारभावातील चढउतार कसे आता कळणार? जाहिरातीच्या अभावी मालाचा उठाव कसा होईल?

वर्तमानपत्र हे जसे करमणुकीचे साधन आहे तसेच लोकशिक्षणाचे पण माध्यम आहे. लोकांना त्यांची कर्तव्ये समजावून सांगणारा तो एक शिक्षकच आहे. परिस्थितीची जाणीव करून देऊन जनमताला तळण लावणाऱ्या व लोकांना शिस्तीचे व सदाचाराचे धडे देणारी ती शाळाच आहे. हीच बंद झाली तर शिक्षणाचे एक मोठे साधनच नाहीसे होईल. मला तरी विशेष वाईट वाटेल, माझ्या साऱ्या आकांक्षा पार धुळीस मिळतील! कारण मी पुढे वर्तमानपत्राचा संपादक होण्याचे ठरविलेले होते, ना!

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×