Advertisements
Advertisements
Question
वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा:
वसाहतवादाची कारणे
Answer in Brief
Solution
वसाहतवादाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- औद्योगिक क्रांती: औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. आधुनिक यंत्रांमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. देशांतर्गत बाजारपेठेत सगळे उत्पादन खपणे शक्य नव्हते. अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी नव्या बाजारपेठांची गरज होती. यासाठी हक्काची बाजारपेठ आणि हुकमी वर्चस्व आवश्यक होते.
- कच्च्या मालाची गरज: व्यापारी स्पर्धेत अन्य स्पर्धक राष्ट्रांपेक्षा स्वतःच्या मालाचा उत्पादन खर्च कमी ठेवणे आवश्यक होते. स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्याची आवश्यकता, मालाचा उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून कच्चा माल स्वस्त किंमतीत मिळवणे गरजेचे होते. त्यासाठी वसाहतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणे युरोपातील राष्ट्रांना आवश्यक होते.
- अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक: औद्योगिक क्रांतीनंतर युरोपातील भांडवलदार वर्ग अधिकच श्रीमंत झाला. अतिरिक्त भांडवल गुंतवण्यासाठी त्याने सुरक्षित बाजारपेठांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यादृष्टीने आर्थिकदृष्ट्या अप्रगत वसाहतींमधील बाजारपेठ अधिक सुरक्षित होती. अतिरिक्त भांडवलाने वसाहतवादाच्या उदयाला आणि विकासाला चालना दिली.
- खनिज साठे: आशिया-आफ्रिका खंडांतील देशांमध्ये सोने, हिरे, चांदी, कोळसा यांचे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे युरोपमधील व्यापाऱ्यांना आशिया-आफ्रिकेतील प्रदेशांचे आकर्षण होते.
shaalaa.com
वसाहतवादाच्या उदयाची कारणे
Is there an error in this question or solution?