English

व्यापारी बँकेची कार्ये स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

व्यापारी बँकेची कार्ये स्पष्ट करा.

Explain

Solution

बचत करणाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणण्यासाठी व्यापारी बँका देशाच्या वित्‍तीय प्रणालीत मध्यस्‍थ म्‍हणून कार्य करतात. त्‍या नफा मिळवणाऱ्या आर्थिक संस्‍था आहेत. व्यापारी बँका बचतीची जमवाजमव (ठेवी स्‍वीकारणे) करण्यात आणि अर्थव्यवस्‍थेच्या विविध क्षेत्रांत कर्ज वाटप करण्यात महत्‍त्‍वपूर्ण भूमिका बजावतात. यात अनुसूचित व बिगर अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश होतो. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम १९३४ च्या दुसऱ्या विभागात अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश आहे. मालकी आणि कार्यपद्धतीनुसार भारतातील व्यापारी बँकांचे चार घटकामध्ये वर्गीकरण केले जाते: सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, विदेशी बँक.

व्यापारी बँकेची कार्ये खालीलप्रमाणे आहेत:

  1. ठेवी स्वीकारणे: ठेवी म्हणजे व्यापारी बँकांसाठी निधीचा मुख्य मार्ग होय. बचतीमुळे ठेवी तयार होतात. ठेवीचे वर्गीकरण मागणी ठेवी आणि मुदत ठेवी म्हणून केले जाते.
    1. मागणी ठेवी: मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी असे म्हणतात. त्या चालू ठेवी आणि बचत ठेवीच्या स्वरूपात आहेत.
      1. चालू ठेव खाते हे सामान्यपणे व्यापारी, सार्वजनिक संस्था आणि विश्‍वस्त मंडळाकडून उघडले जाते. चालू ठेवी खातेधारकांना शिलकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत (अधिकर्ष) दिली जाते.
      2. बचत ठेवी विशेषतः पगारदार वर्ग व छोटे व्यापारी यांच्याकडून ठेवल्या जातात.
    2. निश्‍चित कालावधी ठेवी: या ठरावीक कालावधीसाठी ठेवल्या जातात. यामध्येच आवर्त ठेवी व मुदतबंद ठेवी यांचा समावेश केला जातो.
      1. आवर्ती ठेवी ग्राहकांना नियमितरीत्या बचत करण्यास प्रोत्साहन देतात. ठरवून दिलेल्या कालावधीनंतर एक निश्‍चित रक्‍कम ग्राहकांना द्यावी लागते.
      2. मुदतठेवी ठरावीक कालावधीसाठी ठेवल्या जातात. या ठेवीत असलेली रक्‍कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढता येते. यावर दिला जाणारा व्याजदर तुलनेने अधिक असतो.
  2. कर्ज देणे: व्यापारी बँका ठेवीदाराकडून घेतलेल्या ठेवींचा वापर गरजूंना कर्ज देण्यासाठी वापरतात. बँका, व्यक्‍ती आणि संस्थांना विविध कारणांसाठी कर्ज पुरवठा करत असतात. कर्ज, रोख कर्ज, अधिकर्ष सवलत यांचा समावेश अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी केला जातो. कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका व्याजदर अधिक असतो. याशिवाय बँका रोख कर्ज, अधिकर्ष सवलत व हुंडी वटवणे इत्यादी सुविधा पुरवितात.
  3. साहाय्यक कार्ये: व्यापारी बँका निधी हस्तांतरण ग्राहकाच्या वतीने रक्‍कम जमा करणे, ग्राहकांच्या वतीने प्रासंगिक देणी देणे, परकीय चलन, सुरक्षित ठेव कप्पा, डिमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिग यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करतात. 
  4. पतनिर्मिती: पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. प्राथमिक ठेवींच्या आधारावर बँका पतनिर्मिती करतात. निव्वळ मागणी आणि वेळेचे दायित्व यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतरची शिल्लक रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात. अशा प्रकारे बँकांनी दिलेल्या कर्जांमधून दुय्यम ठेवी निर्माण होतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×